आॅनलाईन लोकमतयवतमाळ : अपघात हाताळण्यासाठी अधिकारी न पोहोचल्याने चालकाला संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. यवतमाळ आगाराच्या या गलथान कारभारामुळे कामगारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार कामगार सेनेचे यवतमाळ आगार अध्यक्ष शैलेश जगदाळे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.१५ मार्च रोजी यवतमाळ-धामणगाव (बस क्र. ८३५१) ही बस रात्री ९.१५ वाजता बाभूळगाव येथील कॉटन मार्केटजवळ उभ्या ट्रकवर आदळली. घटनेची माहिती चालकाने बसस्थानक प्रमुखांना कळविली. यानुसार प्रवाशांच्या सोयीकरिता चालकासह दुसरी बस पाठविण्यात आली. मात्र अपघात हाताळण्याची जबाबदारी असलेले आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख व इतर पर्यवेक्षकांपैकी कोणीही घटनास्थळी पोहोचले नाही. यवतमाळ आगार ते अपघातस्थळ हे अंतर केवळ २५ किलोमीटर आहे. मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने तत्काळ तेथे पोहोचण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे चालक कुमरे यांना संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. दुसºया दिवशी अर्थात १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बसस्थानक प्रमुख घटनास्थळी पोहोचले. तब्बल १२ तास बसचा खोळंबा झाला. एफआयआर होण्यास उशीर झाला. आगार प्रमुख किंवा बसस्थानक प्रमुख वेळीच पोहोचले असते तर राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा जनमाणसात मलीन होण्यापासून वाचविता आली असती, असे जगदाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.‘त्या’ घटनेची आठवणकाही दिवसांपूर्वी पुलगाव आगाराची नादुरुस्त बस रस्त्यावर उभी होती. बराचवेळपर्यंत मदत मिळाली नाही. मदतीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या चालक-वाहकांचा अपघातात मृत्यू झाला होता. केवळ अधिकाºयांचा बेजबाबदारपणा या घटनेला कारणीभूत ठरला. या घटनेपासूनही बोध घेतला जात नाही. अपघात हाताळण्यासाठी चालढकल केली जाते. बाभूळगाव येथील घटनेविषयीसुद्धा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. या अधिकाºयांवर राज्य परिवहन महामंडळाच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई व्हावी, असे शैलेश जगदाळे यांनी म्हटले आहे.
चालकाला काढावी लागली बसमध्ये रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 21:58 IST
अपघात हाताळण्यासाठी अधिकारी न पोहोचल्याने चालकाला संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. यवतमाळ आगाराच्या या गलथान कारभारामुळे कामगारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
चालकाला काढावी लागली बसमध्ये रात्र
ठळक मुद्देगलथान कारभार : बाभूळगाव येथील घटना, आगाराचे अधिकारी पोहोचले १२ तास उशिरा