शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘केम’ प्रकल्प घोटाळ्यात ‘डीपीएम’वर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:23 IST

‘केम’ प्रकल्पातील बहुचर्चित गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावर (डीपीएम) विभागीय महसूल आयुक्तांनी ठपका ठेवला आहे.

ठळक मुद्देजबाबदारी निश्चित करण्याचे आदेश : आता प्रतिक्षा पोलीस ठाण्यातील तक्रारीची

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘केम’ प्रकल्पातील बहुचर्चित गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावर (डीपीएम) विभागीय महसूल आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाईचे आदेश १ सप्टेंबर रोजी यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.‘केम’ (कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास) प्रकल्पात एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील दहा कोटींचा खर्च वादाच्या भोवºयात सापडला आहे. त्यातून ब्युटी पार्लर, कौशल्य विकास, पशुधन, प्रशिक्षण, पुस्तक खरेदी आदी उपक्रम राबविले. त्यामध्ये अनियमितता असल्याचे ‘केम’च्या अमरावती कार्यालयाने केलेल्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते.या प्रकरणात ‘केम’चे तत्कालीन यवतमाळ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रथमदर्शनी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०१६ ते २१ एप्रिल २०१७ या काळात ते येथे कार्यरत होते. २६ आॅगस्ट रोजी अमरावतीमध्ये ‘केम’च्या एकूणच कारभाराचा आढावा घेतला गेला. त्यात दोषींवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून फौजदारीचे निर्देश दिले आहे.‘डीपीएम’चे अमरावतीच्या ‘एपीडी’कडे बोटप्रथमदर्शनी दोषी ठरविण्यात आलेल्या तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांनी (डीपीएम) आता अमरावतीच्या तत्कालीन अतिरिक्त प्रकल्प संचालकाकडे (एपीडी) बोट दाखविले आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच आपण कामकाज केल्याचे ते सांगत आहे. तर ‘लोकमत’ने ब्युटी पार्लर प्रशिक्षणावर २८ लाखांचा खर्च हे वृत्त प्रकाशित करताच अमरावतीचे ते अतिरिक्त प्रकल्प संचालक अचानक सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. या पार्लरचे ‘ब्युटी’ कनेक्शन थेट पुण्यात असल्याची चर्चा ‘केम’ प्रकल्पात आहे. थेट आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्याने आता यात किती लोकांना हातकड्या लागतात हे पाहणे महत्वाचे ठरते.