शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा महसूल विभाग कंत्राटदारांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन होऊनही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही. यावरून या विभागाचे अधिकारी बांधकाम कंत्राटदारांच्या दावणीला बांधल्याची ओरड जनतेतून होऊ लागली आहे.७०० कोटींच्या महामार्गाचे बांधकाम केले जात आहे. या ...

ठळक मुद्दे७०० कोटींचा महामार्ग : अवैध उत्खनन, अधिकाऱ्यांना वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन होऊनही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही. यावरून या विभागाचे अधिकारी बांधकाम कंत्राटदारांच्या दावणीला बांधल्याची ओरड जनतेतून होऊ लागली आहे.७०० कोटींच्या महामार्गाचे बांधकाम केले जात आहे. या एकाच कामाचे दोन कंत्राटदारांकडून बांधकाम होत आहे. त्यासाठी या कंत्राटदारांनी दारव्हा व दिग्रस तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले आहे. परवानगीपेक्षा अधिक जागेत व प्रमाणात हे उत्खनन करण्यात आले. या गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी पोलीस व आरटीओच्या अधिकाºयांना हाताशी धरुन चक्क कालबाह्य व विना क्रमांकाच्या टिप्पर व वाहनांचा वापर केला जात आहे. त्यासाठी ही वाहने चोरट्या मार्गाने तेलंगणातून पिंपळखुटी चेक पोस्टच्या डोळ्यात धूळ फेक करुन जिल्ह्यात आणण्यात आली आहे. ‘लोकमत’ने या संबंधी वृत्तही प्रकाशित केले. मात्र त्यानंतरही दारव्ह्याचा महसूल विभाग हलला नाही. तहसीलदारांनी संंबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांना चौकशीचे आदेश दिले. परंतु वरिष्ठांची खानापूर्ती लक्षात आल्याने या कनिष्ठांनीही त्यांना जुमानले नाही. त्यांनी आपला चौकशी अहवालाच सादर केला नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांनी या दोघांनाही कारणेदाखवा नोटीस बजावली. त्यांची ही कारवाई शासकीय खानापूर्ती असल्याचे स्पष्ट होत आहे.वास्तविक तालुका व उपविभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करून जमिनीतील ‘हांडे’ खाली केले जात असताना महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांना तेथे स्थळ भेटीसाठी वेळ मिळू नये, यातच त्यांचे खरे अपयश लपले आहे. महसूल खात्याच्या संगनमतानेच हे अवैध उत्खनन झाल्याचा संशय येऊ लागला आहे. खनिकर्म विभागाचे अधिकारीही यात सहभागी असण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास वेगळेच वास्तव उघड होण्याची शक्यता आहे.