शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कोरोनाला घाबरू नका, पण खबरदारी जरूर बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो.

ठळक मुद्देसध्याच मास्क लावण्याची गरज नाही

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. कोणीही घाबरू नये.- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सकरुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक जण सर्दी, खोकला आणि शिंका येणाऱ्या व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहात आहे. मुळात कोरोना आणि सर्वसामान्य आजार यात फरक आहे. घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घ्यावीच लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागणार आहे. स्वच्छता पाळावी लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी साधलेला संवाद...सर्दी-खोकल्याचे रूग्ण आणि कोरोनाचे रूग्ण यात काय फरक आहे?वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो. कोरोनाचा विषाणू भारतात निर्माण झालेला नाही. या आजारात सतत ताप राहतो. खोकला थांबत नाही. इतरही काही लक्षणे असतात. त्याकरिता तीन चाचण्या घेतल्या जातात. तीन चाचण्या ‘निगेटीव्ह’ आल्यावरच रूग्णाला सुटी दिली जाते.मास्क बांधणे आवश्यक आहे काय?मुळात मास्कची काहीच सध्याच गरज नाही. उलट अधिक वेळ मास्क राहिला तर त्यावरूनही जंतू पसरू शकतात. त्यापेक्षा स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. तो दररोज स्वच्छ धुतलेला असावा. स्वच्छ रूमाल सुरक्षित आहे.हॅन्डवॉश गरजेचे आहे काय?कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. यामध्ये स्वत:ची स्वच्छता, परिसर स्वच्छता करणे आणि वारंवार हात धुतले पाहिजे. स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले तरी चालतील. भाज्या धुऊन आणि पूर्ण शिजवूनच खाव्या. आपली स्वच्छता ही विषाणू पसरण्यापासून पायबंद घालण्यास मदत करणारी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगली पाहिजे.६० वर्षांवरील वृद्धांना जपण्याची आवश्यकताकोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद अशी सर्वच यंत्रणा अलर्ट आहे. ती युद्धपातळीवर काम करीत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृतीचे काम सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार कोरोना रूग्णात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या जास्त आहे. ० ते ९ वर्षे वयोगटात अशा रूग्णांची संख्या नगण्य आहे. २० वर्षापेक्षा अधिक वय असणाºया रूग्णांची संख्या केवळ २ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना