शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डोईवर सूर्य, कडेवर तान्हुलं... रस्त्यावर फिरतेय अगतिक माय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:05 IST

गर्भार लेक-सून घरात असली, तर अवघे घर तिची काळजी घेऊ लागते. पण ‘तिच्या’ नशिबी हे प्रेम नाही आले. ती रस्त्यावर प्रसवली. तापमान ४५ अंशावर असताना आपलं तान्हुलं कडेवर घेऊन ती रस्तोरस्ती फिरतेय. कुणी तिला मदत म्हणून जवळ गेले तरी ती ‘भीक नको’ म्हणून झिडकारते.

ठळक मुद्देयवतमाळकर हळहळले : पण मदत घेण्यासही तिचा नकार, महिला व बालकल्याणची चमूही हतबल

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गर्भार लेक-सून घरात असली, तर अवघे घर तिची काळजी घेऊ लागते. पण ‘तिच्या’ नशिबी हे प्रेम नाही आले. ती रस्त्यावर प्रसवली. तापमान ४५ अंशावर असताना आपलं तान्हुलं कडेवर घेऊन ती रस्तोरस्ती फिरतेय. कुणी तिला मदत म्हणून जवळ गेले तरी ती ‘भीक नको’ म्हणून झिडकारते. संवेदनशील माणसांना तिच्याकडे पाहून प्रश्न पडतो... काय असेल तिची कहाणी? उत्तर अजून तरी मिळालेले नाही. कारण ती फार काही बोलतही नाही...पण शुक्रवारी ती जरा खुलली, किंचित बोलली. अन् पुढे आली करुण कहाणी. सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ३०-३२ वर्षे वयाची ही माय लेकराला पान्हा देताना काही जणांना दिसली. अनेकांना वाटले ती विमनस्क असावी. तिची काहीतरी व्यवस्था व्हावी म्हणून लोकांनी महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले. या विभागाच्या कविता राठोड व त्यांची चमू जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचली. मात्र परिसरात कुठेही तिचा थांगपत्ता लागला नाही. शहरभर शोधाशोध करताना दुपारी ही माय बसस्थानक परिसरात फिरताना आढळली. महिला व बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांनी या ‘आई’ला स्वाधारगृहात चला, किमान दवाखान्यात तरी चला म्हणून विनंती केली. मात्र तिने स्पष्ट नकार दिला. ‘माझे स्वत:चे घर आहे. पण त्यावरचे टिन उडून गेले. त्यावर टिन टाकून द्या. मी माझ्या घरातच राहायला तयार आहे’ असे काहीसे त्रोटक बोलून ती बाळासह निघून गेली.तिचे बाळ आज किमान दोन महिन्यांचे आहे. त्याला भरउन्हात घेऊन ही आई फिरत आहे. त्यामुळे बाळाची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे महिला व बालकल्याणची चमू तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागली. अखेर शहरातीलच रंभाजी नगरात तिचा एक दूरचा नातेवाईक असल्याचे कळले. एकाच खोलीत आपले कुटुंब घेऊन तो राहतो. त्याच्या घरी गेल्यावर तो म्हणाला, ती कुणाचेही ऐकत नाही. तिचा पहिला पती मरण पावला. कळंब तालुक्यातील युवकाशी तिचा दुसरा विवाह लावून देण्यात आला. मात्र ती आता एकटीच फिरत असते. कोटंबाजवळील पिंपरीत माहेर आहे. पण आईवडील, भाऊ मरण पावले. घरही पडले. आता ती येथे फिरते, माझेही ऐकत नाही.डोईवर सूर्याने डोळे वटारलेले, खाली जमीन प्रचंड तापलेली, त्यात ही माय कोवळा जीव कडेवर घेऊन फिरत असताना संवेदनशील यवतमाळकरांचे मन कासाविस होत आहे. मात्र कोणत्याही मदतीसाठी ही आई तयार नाही. तिच्या नातेवाईकाने सांगितलेली कहाणी ऐकून महिला व बालकल्याणच्या चमूलाही काय करावे ते सूचेनासे झाले आहे.‘तिने’ जगासाठी मूल सोडले...‘हिने’ मुलासाठी जग सोडलेमातृत्वाची दोन रूपे सध्या यवतमाळकरांना संभ्रमात पाडणारी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी पांढरकवडा-यवतमाळ एसटी बसमध्ये एक आई आपल्या नवजात बाळाला सोडून निघून गेली. त्या आईचा आजवर थांगपत्ता लागलेला नाही. कदाचित जगाच्या नजरेत आपली ‘इज्जत’ राखण्यासाठी तिने मूल सोडून दिले. पण शुक्रवारी यवतमाळ बसस्थानकावरच आढळलेली ही दुसरी आई मात्र अवघे जग सोडून केवळ आपल्या मुलाला काळजाशी कवटाळून फिरत आहे. पहिलीला जगाची भीती वाटली म्हणून तिने मुलाला बेवारस सोडले. तर दुसरीला मुलाची काळजी वाटली म्हणून तिने जगाला झिडकारले.