शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डॉक्टरांचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2017 00:28 IST

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन स्तरावरून पदे भरण्यास विलंब होत असल्याने शासनानेच ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणारे १२६ उपकेंद्र आहेत. याशिवाय काही ठिकाणी आयुर्वेद दवाखाने आहेत. या सर्वांसाठी गट ‘ब’ची १२५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी १०१ पदे भरण्यात आली असून २४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. यापूर्वी १६ पदे रिक्त होती. ती आता वाढून २४ वर गेली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांत एका वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्यात आले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील ६३ पैकी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नाहीत. अपुऱ्या डॉक्टरांअभावी तेथे कुणाचीही नियुक्ती केली गेली नाही. अनेक तालुक्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. तेथील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तालुका आरोग्य अधिकारी पदाचा प्रभार देऊन गाडा हाकला जात आहे. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले आहेत. शासनाने ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात तीन सहायक अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सहाय्यक करणारेच अधिकारी नाही. त्यामुळे पावसाळ्यात जिल्ह्यात साथरोगांची लागण झाल्यास आरोग्य विभागाला ती नियंत्रणात आणणे कठीण होणार आहे.