शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये लिपिकानेच चोरला डॉक्टरचा मोबाईल

By admin | Updated: June 24, 2017 00:37 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागातील बाह्यरूग्ण तपासणी कक्षातून

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागातील बाह्यरूग्ण तपासणी कक्षातून वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या तपासात यात लिपिकच चोर असल्याचे निष्पन्न झाले. राजेश रमेश हेमणे (३५) रा. शासकीय रुग्णालय वसाहत, असे त्या लिपिकाचे नाव आहे. गेल्या ६ जूनला डॉ. प्रवीण प्रजापती रूग्ण तपासणी करीत असताना दुपारी त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. प्रथम बाहेरील व्यक्तींवर संशय असल्याने अनेकांची चौकशी करण्यात आली. अखेर सायबर सेलमधून मोबाईल चोरीचा सुगावा लागला. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय श्रीकांत जिंदमवार, भीमराव शिरसाठ, गजानन डोंगरे, विशाल भगत यांनी तांत्रिक बाजूची मदत घेतली असता मोबाईल रूग्णालय परिसरातच असल्याचे आढळले. त्यांनी या परिसरात झडती घेतली. त्यात लिपिकानेच मोबाईल चोरल्याचे आढळले. सीम कार्ड का बदलले, याची विचारणा करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मोबाईल काढून दिला.