शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
2
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
3
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
4
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
5
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
6
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
7
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
8
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
9
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
10
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
11
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
12
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
13
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
14
परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद! ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार?
15
बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल
16
भीषण अपघात, भरधाव कार रस्त्यावरून घसरून झाडावर धडकली, तीन मित्रांचा जागीच मृत्यू 
17
Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी
18
आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
19
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....
20
बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली

लहान मुलांचा साधा तापही अंगावर काढू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

मुलांच्या बाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, जेणे करून गंभीर धोका टाळता येतो. मागील तीन महिन्यांत कुटुंबातील व्यक्ती पाॅझिटिव्ह येऊन गेली अशा कुटुंबातील मुलाला जोराचा ताप आला असेल तर त्याची अँटिबाॅडी तपासणी करणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला कोरोना होऊन गेला की काय याचे निदान होते.

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे म्हणून उलटी, पातळ संडास हे मानले जात होते. आता मात्र अचानक आलेला तापही धोक्याचा ठरू शकतो. संभाव्य तिसरी लाट जिल्ह्यात अजून दाखल झालेली नाही. मुलांच्या बाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, जेणे करून गंभीर धोका टाळता येतो. मागील तीन महिन्यांत कुटुंबातील व्यक्ती पाॅझिटिव्ह येऊन गेली अशा कुटुंबातील मुलाला जोराचा ताप आला असेल तर त्याची अँटिबाॅडी तपासणी करणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला कोरोना होऊन गेला की काय याचे निदान होते. पाॅझिटिव्ह असताना बरेचदा कोरोनाचे निदान होत नाही. लक्षणानुसार उपचार होतात. 

सर्दी, खोकला, तापाची साथ

सर्दी व खोकला हा आजार मानला जात नव्हता. मुलांना घरगुती उपचार करूनच बरे केले जात होते. काही दिवसानंतर आराम न पडल्यास डाॅक्टरांकडे नेण्यात येत होते. ही बाब आता धोकादायक आहे. वेळीच योग्य उपचार घेणे गरजेचे झाले आहे. 

बालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरबालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर तयार केले आहे. पीसीसीमध्ये ४० बेड, पीआयसीयूमध्ये ३९ बेड, कुपोषित बालकांसाठी ६ बेड आरक्षित ठेवले आहे. याशिवाय खासगी बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्तरावरही बालकांच्या उपचाराची व्यवस्था केली आहे. 

ताप आला म्हणजे कोरोना झाला असे नाही...- ताप आला म्हणजे कोरोना होय असे नाही. मात्र योग्य डाॅक्टरांचा सल्ला घेवून सर्दी, ताप, खोकला याचा उपचार करणे गरजेचे आहे. - बरेचदा डाॅक्टर कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यविषयक माहितीवरून उपचाराची दिशा ठरवितात. त्यामुळे गफलत होत नाही. - सर्दी, तापापेक्षाही सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. मुलांमध्ये डेंग्यूची साथ दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क असणे आवश्यक आहे. 

घाबरू नका, काळजी घ्याकोरोनाची संभाव्य लाट येणार आहे. याची धास्ती घेणे चुकीचे आहे. सतर्क राहून व काळजी घेवून आपण मुलांना यापासून सुरक्षित ठेवू शकतो. साधे आजारपणही आता दुर्लक्ष करण्यासारखे नाही. - डाॅ. अजय केशवाणी, बालरोगतज्ज्ञ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या