शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी पद्धतीने शेती केल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही

By admin | Updated: June 17, 2017 01:15 IST

बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुसद येथे मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्त अ‍ॅड.खेडेकर आले असता त्यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास बातचित केली. शेतकऱ्यांनी शेतीपती होण्यापेक्षा उद्योगपती व्हावे, ही भूमिका मराठा सेवा संघाने मागील २६ वर्षांपासून घेतली आहे. जात्यावर बसले की दळायला येते, याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना टप्प्याटप्प्याने शेतीपासून दूर करायला हवे. पाल्यांनी आपले पर्याय आपल्या व्यक्तिगत कौशल्यावर निवडले पाहिजे. शेती हा मराठा सेवा संघाला लागलेला फार मोठा फास आहे. जगात कोणीही शेतकरी मोठा झाला नाही. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलविली पाहिजे. जिवंत राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. बाजारात काय विकते, यानुसार शेतकऱ्यांनी शेती करावी, असे त्यांनी सांगितले. मराठा सेवा संघाच्या उद्दिष्टाबाबत बोलताना अ‍ॅड.खेडेकर म्हणाले, १९९० मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. ३३ कक्षांची निर्मिती करून सर्व घटकांना समाविष्ट करण्यात आले. आता मात्र लोककल्याणकारी कार्य करण्याची परंपरा खंडित झाली आहे. जुने, नवे पदाधिकारी यांच्यात वितंडवाद आहे. परिणामी मराठा सेवा संघाचा एकजिनशीपणा अस्ताव्यस्त झाले आहे. पदाधिकारी आपआपल्या पदांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे संवाद व संपर्क तुटला आहे. तो पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आपण व आपले काही निवडक सहकारी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने घराबाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत साशंकता मराठा आरक्षणाबाबत बोलताना अ‍ॅड.खेडेकर म्हणाले, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश असावा, ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छिते. आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत साशंकता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.अर्जुन तनपुरे, डॉ.दिलीप महाले, दिगंबर जगताप, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, प्रवीण कदम, प्रकाश बेद्रे, यशवंत चौधरी, प्रभाकर टेटर आदी उपस्थित होते.