शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षपूर्तीचा उत्सव नको, संपर्क वाढवा

By admin | Updated: October 17, 2015 00:52 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या वर्षपूर्तीचा कुठेही उत्सव साजरा करू नका, त्याऐवजी जनतेत शेवटच्या माणसापर्यंत संपर्क अभियान राबवा, ...

भाजपा आमदारांना निर्देश : तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या वर्षपूर्तीचा कुठेही उत्सव साजरा करू नका, त्याऐवजी जनतेत शेवटच्या माणसापर्यंत संपर्क अभियान राबवा, असे निर्देश जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. युती सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत राज्यातील भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. सरकारच्या व आमदारांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीत संबोधित केले. युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून कुठेही उत्सव साजरा करू नये, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या. त्याऐवजी गेल्या वर्षभरात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या हितार्थ जाहीर केलेल्या योजना, राज्य शासनाच्या लोकांसाठी असलेल्या योजनांची माहिती, पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी लोकांमध्ये जा, संपर्क अभियान राबवा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील एका आमदाराने ‘लोकमत’ला दिली. मात्र भाजपाच्या विस्तारासाठी दिलेला कार्यक्रम, शिवसेनेकडून मिळणारी वागणूक व अन्य काही मुद्यांवर झालेल्या चर्चेची माहिती देणे या आमदारांनी टाळले. (जिल्हा प्रतिनिधी)