हंसराज अहीर : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश, निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी जनमतावर भरयवतमाळ, : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारने पाणी टंचाई निवारण आणि शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुरु केलेले महत्वाकांक्षी अभियान आहे. त्यामुळे या अभियानाचा उद्देश सफल होण्यासाठी योग्य नियोजन करुन दजेर्दार कामे करावीत, असे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्यमंत्री अहिर यांनी जलयुक्त शिवार अभियान, सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, खरीप पिक कर्ज याचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बैठकीला उपस्थिती होते. जिल्ह्यात नाल्यांचे प्रमाण खुप आहे. जलयुक्त शिवार अभियानात नाला सरळीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याची कामे झाल्यास शेतीला तसेच नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. अशाच प्रकारच्या कामासाठी अचूक नियोजन करावे. प्रधानमंत्री सिंचन योजनेव्दारे कामासाठी निधी उपलब्ध करता येईल, असे ना. अहिर यांनी सांगितले. जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लोकांचे गैरसमज दुर करुन त्यांचा विश्वास संपादन करावा. या प्रकल्पाच्या कामाला गती येण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री अहिर यांनी दिल्या. या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांसाठी किती निधी आला. याबाबत माहिती घेऊन मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करण्यात येईल, असे हंसराज अहीर यांनी बैठकीत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)सोनखास परिसरात जलयुक्तच्या कामात अनियमिततासोनखास : परिसरात जलयुक्त शिवार अभियानाची कामे ही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच लाटली आहेत. जल व मृद संधारणाच्या उद्देशाने करण्यात येत असलेल्या कामात तांत्रिक त्रृट्या आहेत. मात्र वनविभाग व कृषी विभागातील यंत्रणा या पुढारी कंत्राटदारांशी आर्थिकदृष्ट्या जुळलेली आहेत. त्यामुळे थातूरमातूर काम सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाणलोटच्या सर्व योजना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले. यामध्ये मातीनाला बांध, पाणीसाठवण तलाव, वन तलावातील गाळ काढणे, वनतळे, कृषी विभागातून नाला सरळीकरण, नाला रुंदीकरण, शेततळे अशी कामे करण्यात येत आहे. वनविभागाकडून तालुक्यात ५६ लाख ४२ हजारांची कामे सुरू करण्यात आली आहे. भाडेपट्टीवर आणलेल्या जेसीबी व पोकलँड मशीनच्या सहाय्याने रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे. केवळ मातीचे ठिगारे उभारून पाणी अडविण्याचा प्रयत्न होत आहे. या चुकीच्या कामांमुळे भविष्यात गावात मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)
जलयुक्त शिवार अंतर्गत दर्जेदार कामे करा
By admin | Updated: May 3, 2015 23:58 IST