शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अवकाळी पावसाने थंडावला दिवाळीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 06:23 IST

लक्ष्मीपूजनानंतरही गायगोधन, भाऊबिजेपर्यंत दिवाळीची बाजारपेठे तेज असते. यंदा मात्र सोमवारी यवतमाळातील मेनलाईन चक्क सकाळी ११ वाजतापर्यंत बंद असल्यासारखी स्थिती होती. त्यानंतर दुकाने उघडली, तरी ग्राहकांची वर्दळ अत्यंत विरळ होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेट बँक चौकात बऱ्यापैकी खरेदीसाठी झुंबड दिसली.

ठळक मुद्देविक्रेत्यांचे प्रचंड हाल : ग्राहकांचा अनुत्साह, पंधरवड्याचा धंदा एकाच दिवसात गुंडाळला

अविनाश साबापुरेयवतमाळ : जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळात पंधरा दिवस चालणारा दिवाळीचा बाजार यंदा अवघ्या एका दिवसात गुंडाळला. ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसाने बाजारपेठेवर चक्क मरगळ साचली आहे. मौसम नसताना आलेल्या पावसाने खरेदीचा मौसम तोडल्याचे दु:ख एकीकडे नोकरदारांनी व्यक्त केले, तर दुसरीकडे पावसाने शेतमजुरीतला रोजगार हिरावल्याने गावखेड्यातील खरेदीदार यवतमाळपर्यंत पोहोचलेच नाही. मध्यमवर्ग, मजूरवर्ग अशा दोन्ही ग्राहकांनी खरेदी टाळल्याने व्यापारी मात्र हताश झाले आहेत.यवतमाळात दरवर्षी दिवाळीच्या महिनाभरापूर्वीपासून दुकानदार ‘स्टॉक’ भरतात. पंधरा दिवसांपूर्वीपासून मुख्य दुकानाच्या पुढे ‘हंगामी’ दुकान थाटून बाजार सजवितात. यंदा ऐन आॅक्टोबरच्या मध्यापासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही ‘हंगामी’ दुकाने बाहेरच येऊ शकली नाही. त्यातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कशीबशी दुकाने सजली. त्यामुळे रविवारचा दिवस खरेदीदारांसाठी पर्वणी ठरला. दिवसभर खरेदीसाठी झुंबड उडाली. मात्र सायंकाळ होताच पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि बाजार गुंडाळावा लागला. पावसामुळे घरी परतलेला खरेदीदार पुन्हा मार्केटकडे फिरकलाच नाही. आझाद मैदान परिसरात फटाक्यांचे मार्केट यंदा गर्दी खेचू शकले नाही. या मैदानात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते. केवळ रविवारी दुपारी जेवढी फटाके विक्री होऊ शकली, तेवढाच विक्रेत्यांचा दिवाळीचा धंदा झाला. सोमवारी तर या विक्रेत्यांना दिसला ग्राहक की ‘या हो साहेब’ असे ओरडण्याशिवाय पर्याय नव्हता. मच्छी मार्केटसारखी ही ग्राहकांची खेचाखेची करूनही विक्रेत्यांचा धंदा होऊ शकला नाही. तर रविवारी ज्यांनी फटाके खरेदी केली, त्यांनाही मनमुराद फटाके फोडता आले नाही. रात्री आलेल्या पावसाने फटाक्यांवर एकप्रकारची बंदीच घातल्याची स्थिती होती.

लक्ष्मीपूजनानंतरही गायगोधन, भाऊबिजेपर्यंत दिवाळीची बाजारपेठे तेज असते. यंदा मात्र सोमवारी यवतमाळातील मेनलाईन चक्क सकाळी ११ वाजतापर्यंत बंद असल्यासारखी स्थिती होती. त्यानंतर दुकाने उघडली, तरी ग्राहकांची वर्दळ अत्यंत विरळ होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेट बँक चौकात बऱ्यापैकी खरेदीसाठी झुंबड दिसली. मात्र सायंकाळपर्यंतच. जी लक्ष्मीमूर्ती दुपारी ५०० रुपयांची होती, तीच सायंकाळी ५० रुपयात विकायला दुकानदार तयार झाले. यंदा गरजेपेक्षा माल अधिक आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती आर्णी मार्गावर पाहायला मिळाली.

लक्ष्मीपूजनासाठी बाजारात आलेली झेंडूची फुले पावसात भिजली. या फुलांकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही. ५० रुपये किलोची फुले २० रुपये किलोनुसार द्यायला विक्रेता तयार असतानाही काही ग्राहक मात्र १० रुपयात मागण्याचा ‘पराक्रम’ करताना दिसले. त्यामुळे कंटाळलेल्या विक्रेत्यांनी फुलांची पोतीच्या पोती रस्त्यावर फेकून दिल्याचे पाहायला मिळाले. सतत बरसणाºया पावसाने यंदा गृहसजावटीच्या साहित्य खरेदीवर मोठा परिणाम जाणवला. कागदी फुले, प्लास्टिक फुले, हार आदी साहित्याला अजिबात उठाव दिसला नाही. पावसाच्या धास्तीने यंदा घरावर केली जाणारी रोषणाई मर्यादित राहिली. रंगीत दिव्यांच्या माळा, रेडीयम पट्ट्या आदींची खरेदी करण्यापेक्षा मागील वर्षीचेच जुने साहित्य वापरण्यावर भर दिसला.दिवे मालवले, महिलांची रांगोळी पुसून गेलीलक्ष्मीपूजनासाठी गृहिणींनी खास रंगबिरंगी रांगोळीची खरेदी करून ठेवली होती. पंधरा दिवसांपासून इंटरनेटवर खास डिझाईनही शोधून ठेवल्या. रविवारी दुपारपासून मन लावून महिलांनी भव्य अशी रांगोळी अंगणात साकारली. दुसºया दिवसापर्यंत ही रांगोळी कायम ठेवण्याचा निर्धार होता. मात्र सायंकाळी आलेल्या पावसाने महिलांची कलाकुसर पार पुसून टाकली. सायंकाळी दारापुढे लावलेले दिवेही पावसामुळे तासाभरातच मालविण्याची वेळ आली. तर बच्चे कंपनीलाही फटाके फोडण्याचा नाद लवकरच आटोपता घ्यावा लागला.

टॅग्स :Diwaliदिवाळी