शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

दिवाळीला घरी कापसाचे बोंडही नाही

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच

पुसद : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण सर्वच जण उत्साहात साजरा करतात. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात. कपडेलत्त्यापासून तर घराचे रंगरंगोटीपर्यंत कामे केली जातात. नोकरदार कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शेतकरी मात्र हतबल दिसत आहे. तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला. पावसाचे सुरुवातीचे नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. त्यानंतर जेमतेम पावसात पेरणी आटपावी लागली. त्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली. याचा परिणाम पिकांवर झाला. उडीद, मूग उद्ध्वस्त झाले. सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीन फुलोऱ्यावर आले. त्यावेळेस किडींनी आक्रमण केले. मोझॅक रोगाने पाने पिवळी पडून सोयाबीन उद्ध्वस्त झाले. दरवर्षी १००-१०० पोते सोयाबीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी दहा पोतेही सोयाबीन आले नाही. सोयाबीन काढणीलाही परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोयाबीन प्रमाणेच कपाशीचीही स्थिती आहे. दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. नव्या कापसाची वात दिवाळीतील दिव्यांसाठी वापरली जाते. घरी आलेला कापूस विकून दिवाळी आनंदात साजरी केली जाते. परंतु यंदा कापसाचे बोंडही घरी आले नाही. अपरिपक्व बोंडे फुटत आहे. पणननेही अद्याप कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.पुसदच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी त्यात शेतकरी अत्यल्प आहे. खरेदी करणारे शेतकरी हातचे राखून खरेदी करताना दिसत आहे. उधार-उसने करून मुलाबाळांसाठी नवीन कपडे घेण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. (तालुका प्रतिनिधी)