शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८४.९२ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 01:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ

शुभांकर धर्माधिकारी अव्वल : ४४ शाळा १०० टक्के यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी शुभांकर विवेक धर्माधिकारी ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.९२ टक्के लागला असून ४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेंवर दुपारपासून विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती. दहावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील ६०९ शाळांमधून ३९ हजार ७१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ७२५ म्हणजे ८४.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यासह पाच हजार ६३६, प्रथम श्रेणी १२ हजार १६, द्वितीय श्रेणीत १२ हजार ६०२ आणि तृतीय श्रेणीत तीन हजार ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. ८६.९० टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला २० हजार ८८८ मुले बसले होते. त्यापैकी १७ हजार ३४३ म्हणजे ८३.६ टक्के मुले उत्तीर्ण झाले. तर १८ हजार ८३६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १६ हजार ३८२ म्हणजे ८६.९० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेत लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी शुभांकर धर्माधिकारी याने ९८.४० टक्के गुण पटकाविले आहे. तो जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाचा विद्यार्थी चेतन जयवंत डाखोरे, पुसद येथील नवजीवन ज्ञानपीठचा पीयूष पवन जैन आणि अमेय अनिल डुबेवार या तिघांना ९८ टक्के गुण मिळाले आहे. डॉ.नंदूरकर विद्यालयाचा विद्यार्थी आकाश बाळकृष्ण जमदापुरे याला ९७.४० टक्के, अमृता अनिल मांगुळकर ९७.४०, लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा निखिल भास्कर ढोंगे ९७.२०, सेंट अलॉसेंस इंग्लिश मीडियम स्कूलची तेजस्विनी प्रशांत कोटके ९७.२०, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी अपूर्वा अमोल बढे हिला ९७.२० टक्के, अभ्यंकर कन्या शाळेची विनया विष्णू गाडेकर हिला ९६.८० टक्के, महिला विद्यालयाची आसावरी संदीप भोयर ९६.२० टक्के गुण मिळाले आहे. (नगर प्रतिनिधी) दुर्गम झरीजामणी तालुक्याने मारली बाजी ४आदिवासी बहुल झरी तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदा घवघवीत यश मिळविले. या तालुक्याचा निकाल ८९.६६ टक्के लागला आहे. २१ शाळांमधून ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आदिवासी बहुल तालुक्याने पुढारलेल्या तालुक्यांना मागे टाकल्याचे दहावीच्या निकालात दिसून येते.