शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

By admin | Updated: December 26, 2015 03:18 IST

मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत.

शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे : पोलीस पाटलाचा खून, यवतमाळातील तिहेरी हत्याकांडही गाजलेयवतमाळ : मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथील पोलीस पाटलाचा दारूविके्रत्यांनी केलेला खून आणि नवरात्र संपताच यवतमाळ शहरात घडलेले तिहेरी हत्याकांड सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे होते. शरीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये विभागात आघाडीवर असलेले शहर म्हणून यवतमाळची नोंद आहे. येथे संघटीत गुन्हेगारी विशेष सक्रिय नसली तरी, सातत्याने खुनांच्या घटना घडतात. वर्षभरात ७० खून झाले आहेत. ६६ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. बलात्काराच्या ९२ घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रेत्यांनी खून केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यातच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी पुढे आली. घाटंजी तालुक्यातील क्रुरकर्मा मामाला नात्यातील अल्पवयीन भाचीवर बलात्कार व खुनाच्या आरोपात शत्रुघ्न मेश्राम याला दुहेरी फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली. विशेष म्हणजे हाच निकाला उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यानंतर गणपती उत्सवाच्या काळात यवतमाळ शहरात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना घडल्या. पत्नीनेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला. तर कुख्यात असलेल्या सलिम इक्काचा त्याच्याच साथिदारांनी दगडाने ठेचून खून केला. यापूर्वी देवीनगरातील विद्यार्थिनीला भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून भोसकण्यात आले. तिचा रुग्णालयात दुर्दवी अंत झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनांनी जिल्हा हादरला. पोलीस यंत्रणेने गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये तत्परता दाखविली आहे. डिटेक्शनची टक्केवारीही ७७ टक्के इतकी आहे. झालेल्या पाच हजार ९७१ गुन्ह्यांपैकी चार हजार ६१४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्याही एक हजार १७३ ने घटली आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सात हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. असे असले तरी खुनाच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. दुचाकी चोरींचे ३१ गुन्हे, नवविवाहितांच्या आत्महत्यात १३ ने वाढ, इतर आत्महत्या, निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकार या वर्षात वाढले आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरच्या हल्ल्यात घट झाली असून, वर्षभऱ्यात केवळ ११४ प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत. इतर गुन्ह्यातही घट झाली आहे. सरासरी २०१४ च्या तुलनेत २०१५मध्ये गुन्हेगारीत किंचीत का होईना घट झाल्याचे दिसून येते. मात्र पोलिसांनी खुनासारख्या घटना व जबरी चोरी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. हे सरत्या वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)