शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कार्यालयाच्या शोधात

By admin | Updated: May 25, 2017 01:14 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदल होताच नव्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी दुसरे हक्काचे कार्यालय शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

हक्काचे कार्यालयच नाही : नऊ वर्षांपासून माजी आमदारांच्या बंगल्यात पक्षाचे बस्तानलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदल होताच नव्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी दुसरे हक्काचे कार्यालय शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाविना याची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय माजी आमदार वामनराव कासावार यांच्या आर्णी रोड स्थित घरात थाटण्यात आले आहे. या कार्यालयातूनच काँग्रेसने लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून वामनराव कासावार हेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या घरात पक्षाचे जिल्हा कार्यालय अगदी बिनधास्त सुरू होते. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पुसद येथील डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताच मिर्झा यांनी सर्वप्रथम पक्षाच्या सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यासोबतच पक्षाला स्वत:चे व हक्काचे जिल्हा कार्यालय असावे, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. एवढेच नव्हे तर त्यासाठी प्रयत्नही सुरू केले. डॉ. वजाहत मिर्झा यांनी यवतमाळात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या हक्काच्या कार्यालयासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.जिल्हाध्यक्ष बदलताच अचानक कार्यालयाची शोधाशोध सुरू झाल्याने ‘जुन्या अध्यक्षांनी आपला बंगला रिकामा तर करून मागितला नाही ना?’ याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. प्रभारी जिल्हाध्यक्षपद मिळताच वेगळे काही करून दाखविण्याची धडपड डॉ. वजाहत मिर्झा यांच्यामध्ये पहायला मिळते. त्यातूनच नव्या कार्यालयाचा शोध सुरू झाल्याचे सांगितले जाते. पक्ष कार्यालयासाठी जागा घेतलीकाँग्रेसमध्ये यवतमाळचा राज्याच्या राजकारणात दबदबा आहे. या जिल्ह्याने राज्याला दिर्घकाळ नेतृत्व दिले आहे. या जिल्ह्यातील नेत्यांनी वर्षानुवर्षे मंत्रीपदे भूषविली आहेत. त्यानंतरही पक्षाला जिल्हा मुख्यालयी स्वत:चे व हक्काचे अधिकृत कार्यालय असू नये यातच नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांचे अपयश दडले आहे. मात्र काही महिन्यापूर्वीच काँग्रेसने पक्ष कार्यालयासाठी जागा खरेदी केली आहे. जिल्हा परिषद सभापतींच्या शासकीय निवासस्थानांच्या मागील बाजूला जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाची ही नियोजित जागा आहे. त्यावर कार्यालय उभे होण्याची प्रतीक्षा आहे. आपण बंगला खाली करून मागितलेला नाही. नऊ वर्षांपासून आपल्या बंगल्यात हे कार्यालय सुरु आहे, ते पुढेही कायम राहू शकते. त्यात कोणतीही अडचण नाही. - वामनराव कासावारमाजी आमदार, तथा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी. जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय सध्या पूर्वीच्याच ठिकाणी आहे. मात्र पक्षाला हक्काचे कार्यालय असावे, म्हणून नव्या इमारतीचा शोध घेतला जात आहे.- डॉ. वजाहत मिर्झाप्रभारी अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ.