शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस लागले सण-उत्सवाच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:40 IST

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले.

ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांकडून आढावा : एसपी कार्यालय व मुख्यालयाचा फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. नियंत्रण कक्षातही प्रत्यक्ष भेट दिली. येणाऱ्या सण-उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क करण्याच्या अनुषंगाने महानिरीक्षकांनी आवश्यक माहिती घेतली.विशेष महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी यापूर्वी उमरखेड येथे मॉबलिंचींग विरोधातील मोर्चावरून उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली होती. परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच जिल्ह्यांंना भेटी दिल्या. यवतमाळ जिल्हा मुख्यालयाची पाहणी प्रलंबित होती. येत्या सण-उत्सव व निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हानिहाय भेट देऊन तेथील एकंदरच पोलीस कामगिरी व गुन्ह्यांच्या स्थितीचा आढावा महानिरीक्षक स्वत: घेत आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला त्यांनी भेट दिली. येथील नियंत्रण कक्ष, वाचक शाखा, महिला सेल, सायबर सेल, ठसे तज्ज्ञ विभाग या ठिकाणी भेट दिली. तेथील प्रमुखांशी चर्चा केली. नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासोबत बराच वेळ बंदद्वार चर्चा करून जिल्ह्यातील स्थितीचा आढावा जाणून घेतला. भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा अमरावती परिक्षेत्रात सर्वात मोठा आहे. येथील विभागनिहाय समस्या वेगवेगळ्या आहेत. त्याबाबत उपाययोजनेसाठी कुठली प्रतिबंधात्मक पावले उचलता येईल यावरही चर्चा करून निर्देश दिले.तूर्त प्रत्येक विभागाचा आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा रानडे यांनी घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांनी पोलीस मुख्यालयात भेट दिली. तेथे मानवंदनेचा सोपस्कारही पार पडला. प्रत्यक्ष पाहणीतूनच नेमकी काय स्थिती आहे हे लक्षात येते. त्यानंतरच पुढील उपाययोजना ठरविणे सोईचे ठरते, असे मकरंद रानडे यांनी सांगितले.लवकरच अ‍ॅक्शन प्लॅन - मकरंद रानडेअमरावती परिक्षेत्रातील जिल्ह्यांचा स्वतंत्र आढावा घेतला आहे. त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामगिरीत व सातत्याने पोलिसांपुढे येत असलेल्या अडचणी, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याचा अ‍ॅक्शन प्लॅन एकंदर माहिती गोळा झाल्यानंतरच ठरविण्यात येईल. तूर्त येथील प्रमुख समस्या कुठल्या हे जाणून घेत असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी सांगितले. येत्या काळात येथील धार्मिक सण-उत्सव व विधानसभा निवडणूक शांततेत पार पडाव्या या अनुषंगाने स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून हा अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.