शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
4
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
5
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
6
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
7
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
8
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
9
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
10
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
11
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
12
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
13
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
14
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
15
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
16
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
17
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
18
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
19
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
20
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट

जिल्हा होरपळतोय

By admin | Updated: May 16, 2016 02:35 IST

शहराच्या तापमानाने रविवारी उच्चांक गाठत पारा ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. दोन दिवसांपासून उष्णतेचे लाट ..

पारा ४४.२ : बाजाराचा दिवस असतानाही रस्त्यांवर शुकशुकाट यवतमाळ : शहराच्या तापमानाने रविवारी उच्चांक गाठत पारा ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. दोन दिवसांपासून उष्णतेचे लाट आली असून संपूर्ण जिल्हा होरपळून निघत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने दुपारी स्वयंघोषित संचारबंदीच दिसून येते. रविवारचा आठवडी बाजार असतानाही दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा सोसलेल्या यवतमाळकरांना गत दोन आठवड्यात ढगाळ वातावरणाने चांगलाच दिलासा दिला. एप्रिल महिन्यात ४३.६ अंश सेल्सिअस असलेले तापमान मे महिन्याच्या सुरुवातीला ३७ अंशापर्यंत खाली आले होते. परंतु ढगाळी वातावरण निवळताच तापमानात प्रचंड वाढ झाली. ११ मे रोजी तापमान ३९.५ अंश, १२ मे रोजी ४० अंश, १३ मे रोजी ४२.४ अंश, १४ मे रोजी ४४ आणि रविवारी १५ मे रोजी ४४.२ अंश सेल्सिअसवर पारा जाऊन पोहोचला. अंगाची काहिली करणारा उकाडा कुलरनेही कमी होत नव्हता. दुपारच्या वेळात कुलरमधूनही गरमा हवा फेकली जात होती. रविवार यवतमाळचा आठवडी बाजार असतो. या बाजारावर तापमानाचा परिणाम जाणवला. दर रविवारी दत्त चौकातील रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. दुपारी १२ ते ४ या दरम्यान रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. दत्त चौकातील भाजी मंडीत विक्रेत्यांनी उन्हापासून बचावासाठी छत्र्या लावल्या होत्या. या छत्र्यांचा आधार घेत ग्राहकांची प्रतीक्षा विक्रेते करीत होते. आठवडीबाजारातही असेच दृश्य होते. सायंकाळी ४ पर्यंत ग्राहकच बाजाराकडे फिरकले नाही. शहराच्या सर्वच रस्त्यावर दुपारी जणू संचारबंदी लागल्यागत स्थिती होती. सायंकाळी शीतपेयांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत होते. रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या. रस्त्यावर गरम वाफा निघत असल्याचे भासत होते. या उन्हामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)