शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.

ठळक मुद्दे४५ हजार शेतकऱ्यांची चिंता मिटणार : हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले यशस्वी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निम्या पात्र शेतकऱ्यांचा पहिला हप्ता बँकेला मिळाला आहे. यामुळे ४५ हजार शेतकºयांचे ३३५ कोटींचे कर्जमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.संपूर्ण जिल्ह्यात एक लाख आठ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या योजनेत निवडण्यात आले होते. यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमुक्तीसाठी अपलोड झाले. आठ हजार शेतकरी खाते कर्जमुक्तीला अपात्र ठरले आहेत. तर पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत आहे. ८५ हजार खाते कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार खातेधारकांनी आधार अथेंटिकेशन पूर्ण केले आहे. अद्याप १६ हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी आहे.६९ हजार खात्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३३५ कोटी रूपयांची कर्ज रक्कम जिल्ह्याकडे वळती झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि व्यापारी बँकाचा समावेश आहे. या कर्ज रकमेतून बँक शेतकऱ्यांचे खाते निल करण्याची प्रक्रिया राबविणार आहे. उर्वरित ४० हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अद्याप लांबणीवर आहे. त्यांच्यासाठी ३८५ कोटींची गरज आहे.दुसऱ्या टप्प्यासाठी हवे ३८५ कोटी रुपयेकर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३८५ कोटींची रक्कम अद्याप जिल्ह्याला प्राप्त व्हायची आहे. ही रक्कमही लवकर प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याला कर्जमुक्तीची ३३५ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. बँकांनी हा अहवाल सादर केला आहे. यानंतरची कर्ज वितरणाची प्रक्रियाही बँका राबविणार आहे. यामुळे कर्जमुक्तीला गती मिळणार आहे.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक