शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

जिल्ह्याला ४० कोटी मिळाले

By admin | Updated: February 22, 2017 01:15 IST

प्रमुख खनिज व गौण खनिजाच्या रॉयल्टीतून राज्याला मिळालेल्या निधीतील वाट्यापोटी जिल्ह्याला वर्षभरात

खनिज विकास निधी : खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला यवतमाळ : प्रमुख खनिज व गौण खनिजाच्या रॉयल्टीतून राज्याला मिळालेल्या निधीतील वाट्यापोटी जिल्ह्याला वर्षभरात ४० कोटींचा निधी मिळाला. हा निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच विकास कामांना सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात कोळसा खाणी, रेती घाट, डोलोमाईट, चुनाभट्ट्या, मुरूम आदी गौण खनिजे आहेत. त्यांची रॉयल्टी वसूल केली जाते. ही रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत जमा केली जाते. दरवर्षी राज्याला या माध्यमातून जिल्ह्यातून जवळपास २०० कोटीचा निधी प्राप्त होतो. या जमा होणाऱ्या निधीतील काही वाटा जिल्ह्याला विकास कामांसाठी परत दिला जातो. विशेषत: ज्या तालुक्यातून या खनिजाच्या रॉयल्टीपोटी रक्कम वसूल केली जाते, त्याच भागातील विकास कामांसाठी हा निधी प्राधान्याने खर्ची घालण्याच्या सूचना आहेत. या निधीचा रस्ते, पाणी व प्रदूषणावर मात करणाऱ्या विकास कामांसाठी उपयोग केला जातो. यावर्षी प्रमुख खनिजांच्या माध्यमातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये ३० कोटी, तर गौण खनिजाच्या उत्पादनातील १० कोटी, असे ४० कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले आहे. या रकमेचा विनियोग करता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्याकडे परवानगी मागितली. खर्चाची परवानगी मिळताच पालकमंत्र्याच्या नेतृत्वात बैठक घेऊन हा पैसा खर्ची घालण्याचे नियोजन केले जाणार आहे. (शहर वार्ताहर)