शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गट आणि गणांच्या रचनेला सुरुवात

By admin | Updated: September 5, 2016 01:06 IST

जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेने आता वेग घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची प्रारूप रचना

जिल्हा परिषद : ९ सप्टेंबरला होणार प्रस्ताव सादरयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेने आता वेग घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची प्रारूप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रभाग रचनेला सुरूवात झाली आहे.येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मागील निवडणूक २००१ च्या जनगणनेनुसार झाली होती. मात्र यावेळी होणारी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार अहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील आठ नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. ९ सप्टेंबरपर्यंत आरक्षणाच्या जागेसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर होणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित होणार आहे. तसेच संंबंधित गट आणि गणांचे प्रवर्गनिहाय आरक्षणही निश्चित होणार आहे. त्यामुळे या प्रारूप प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. २३ सप्टेंबरला विभागीय आयुक्त या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देतील. त्यानंतर जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करून ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती व सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करणार आहे.या प्रक्रियेनंतर ५ आॅक्टोबरला गट व गणांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. १० आॅक्टोबरला जिल्हाधिकारी गट, तर संबंधित तहसीलदार गण रचना व आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना काढणार आहे. त्यावर नागरिकांना २० आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर विभागीय आयुक्त १७ नोव्हेंबरला गट व गणांची अंतिम रचना जाहीर करणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. (शहर प्रतिनिधी)इच्छुकांसह नागरिकांना उत्सुकता९ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने येथील निवडणूक विभागात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सॅटेलाईटव्दारे प्रभाग रचनेसाठी कार्यालय सज्ज झाले आहे. त्यामुळे निवडणूक विभागात हलचल वाढली. संभाव्य इच्छुकही या कार्यालयात येरझारा घालताना दिसतात. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील नागरिक, संभाव्य उमेदवार प्रारूप प्रभाग रचना नेमकी कशी होणार, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. प्रारूप प्रभाग रचना सोयीची व्हावी, गट आणि गणात सोयीची गावे समाविष्ट व्हावी, यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र ही रचना अत्याधुनिक सॅटेलाईट पद्धतीने होणार असल्याने कुणालाही त्यात बदल करण्याची संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.