शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
12
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
13
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
14
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
15
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
16
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
17
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
18
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
19
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
20
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले

एसटी कामगारांचे जिल्हाभर धरणे

By admin | Updated: September 29, 2015 03:52 IST

कामगार करार परिपत्रकाचा होत असलेला भंग यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट

यवतमाळ : कामगार करार परिपत्रकाचा होत असलेला भंग यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे जिल्हाभर धरणे देण्यात आले. यवतमाळ आगारात बसस्थानकासमोर झालेल्या धरणे कार्यक्रमात एसटी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शिवाय विभागीय कार्यशाळा, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, नेर, पांढरकवडा, वणी आदी ठिकाणी धरणे देण्यात आले. यवतमाळ आगारात विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, अध्यक्ष हेमराज जावडेकर, एसटी बँक संचालक बोनगिरवार, राहुल धार्मिक, मो. इस्तियाक, जगदाळे, विलास डगवार, नरेंद्र कांबळे, सै.इरफान, गडकर, गणेश पराते, केशव साळुंके, ताई कांबळे, शेंडे, उईके, सलीमभाई, शबनम आदींनी धरणे कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आयोजित धरणे कार्यक्रमात वसंत गावंडे, कापसे, भोसले, गडकर, ढोले, राज महंमद, सै.तारीक, अजय गायकवाड, मीना मराठे, हापसे, आत्राम, पांडे, चापले, शिंदे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास १४ आॅक्टोबर रोजी पुन्हा विभागीय कार्यालयासमोर धरणे दिले जातील, असा इशारा सदाशिव शिवणकर यांनी यावेळी दिला. कामगारांना नियमबाह्य शिक्षेचे प्रकार वाढले आहे. आर्थिक प्रश्नांसह सोयी-सुविधा पुरविल्या जात नाही. रजेचे अर्ज किंवा वैद्यकीय रजा सरसकट नाकारून पिळवणूक केली जाते. बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने भविष्य निर्वाह निधी, उपदान विलंबनाने मिळत आहे. वाहनांच्या तुटवड्यामुळे बसेस वेळेवर मिळत नाही. प्रवासी नसले तरी कामगारांकडून आठ तास काम घेण्यासाठी उशिरा जाणाऱ्या बसेस रिकाम्या सोडल्या जातात. यात एसटीचे नुकसान होत आहे. या व इतर बाबींसाठी धरणे देण्यात आले. (वार्ताहर)४नेर : स्थानिक आगारातील एसटी कामगारांनी सोमवारी धरणे दिले. नादुरुस्त बसमुळे होणारे प्रवाशांचे हाल थांबविले जावे, यासह इतर प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास देण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कामगार संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. धरणे कार्यक्रमात महाराष्ट्र कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव नितीन चव्हाण, मयूर जगताप, संदीप मुने, राजेश कारमोरे, विजय अगम, अ.बशिर खान, कोमल चव्हाण, राजू दातार, रामदास बेले, विनोद पवार, विजय रावते, उमेश लोहकर, दीपक सोनूरकर आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)