शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची एजंसी सोमवारी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:10 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची एजंसी ठरविण्यासाठी सोमवार ११ फेब्रुवारी रोजी बँकेची बैठक होणार आहे. जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांची नोकरभरती घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देपाच संस्थांना पाचारण : वय, परिविक्षाधीन कालावधीही ठरविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची एजंसी ठरविण्यासाठी सोमवार ११ फेब्रुवारी रोजी बँकेची बैठक होणार आहे.जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांची नोकरभरती घेतली जाणार आहे. आॅनलाईन पद्धतीने होणाऱ्या या नोकरभरतीसाठी इच्छुक संस्थांची यादी मागण्यात आली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एजंसीजची गुणवत्ता, पारदर्शकता व अनुभव यावर चर्चा झाली. त्यानुसार नऊ पैकी चार संस्था आॅनलाईन भरती प्रक्रियेसाठी अपात्र असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे उर्वरित पाच संस्थांना ११ फेब्रुवारी रोजी पाचारण करण्याचा निर्णय झाला. शासनाच्या निकषानुसार या पाच पैकी तीनच पात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण उर्वरित दोन संस्थांनी अनुभवाचे सबळ पुरावे जोडलेले नाहीत. पात्र ठरणाºया तीन पैकी दोन संस्थांनी ही भरतीप्रक्रिया राबविण्यास फारसा इंटरेस्ट दाखविलेला नाही. मात्र भरतीची संस्था नेमकी कोण असेल याचा निर्णय ११ फेब्रुवारीला घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंगळवारच्या बैठकीत बँकेतील अन्य विषयांवरही चर्चा झाली. या नोकरभरतीकडून संचालकांना मोठ्या ‘उलाढाली’च्या अपेक्षा होत्या. या भरतीतील ‘एनर्जी’ प्रत्यक्ष बँकेच्या आगामी होणाºया निवडणुकीत खर्च करण्याचा मनसुबा होता. परंतु शासनाचे काटेकोर निकष व आॅनलाईन भरतीत कोणताही गोंधळ करण्यास एजंसीजची असमर्थता यामुळे त्या संचालकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

टॅग्स :bankबँक