शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा जूनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:53 IST

लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देआधी सांगली, मग यवतमाळ : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूच, संचालकही ‘इन्टरेस्टेड’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे.लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती घेतली जात आहे. आॅनलाईन पद्धतीने ही भरती होणार आहे. अमरावतीच्या एका एजंसीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्व काही पारदर्शक राहणार असल्याचा दावा बँकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात त्यात काही तरी ‘अ‍ॅडजेस्ट’ होईल, अशी अपेक्षा ठेऊन सुशिक्षित बेरोजगार बँकेच्या संचालकांकडे आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करीत आहे. संचालकही मग त्यांना ‘नक्की काही तरी मार्ग काढू’ असे सांगून गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काहींनी तर अनेकांकडून लाखो रुपयांचे ‘टोकण’ही घेतल्याची चर्चा आहे.बँकेच्या भरतीचा विषय लोकसभा निवडणुकीमुळे थांबला होता. परंतु २९ एप्रिलला राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा संपल्याने आचारसंहिता शिथील होईल, असे मानून पुन्हा भरतीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या भरतीसाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाईल. मात्र आधी सांगली जिल्हा बँकेची परीक्षा व तेथून आठ दिवसाने यवतमाळ जिल्हा बँकेसाठी परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इच्छुक व आर्थिक सक्षम बेरोजगार युवक व त्यांच्या पालकांनी संचालकांकडे पुन्हा येरझारा सुरू केल्याचे सांगितले जाते.भरतीसाठी नेमके काय ‘तडजोड’ केली जाईल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.या संभाव्य तडजोडीकडे खुद्द संचालकांच्याही नजरा लागल्या आहेत. कारण या तडजोडीवरच त्यांचे आर्थिक ‘दुकान’ अवलंबून आहे. सध्या तरी तडजोडीचे रहस्य भाजपच्या दोन नेत्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगितले जाते.निवडणुकीमुळे भरतीप्रक्रियेवर चर्चा झाली नाही. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर एजंसीकडून आॅनलाईन परीक्षा घेतली जाऊ शकते. या परीक्षेशी बँकेचा थेट कुठेही संबंध नाही.- अमन गावंडेअध्यक्ष, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :bankबँक