गळफास लावला : पोलिसांनी घेतली नोंद यवतमाळ : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओम कॉलनी शाखेत कार्यरत कर्मचारी महिलेने गुरुवारी रात्री येथील हनुमाननगरातील घरात आत्महत्या केली. ही घटना रात्री उशीरा उघडकीस आली. शिल्पा सुशांत माळोदे (३२), असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शिल्पा ही पती सुशांतसह हनुमाननगर येथे राहात होती. त्यांचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला चार वर्षाचा मुलगा आहे. पती सुशांतपुणे येथे एका बँकेत नोकरीला आहे. मागील काही दिवसांपासून शिल्पा जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक म्हणून कार्यरत होती. गुरुवारी रात्री तिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला असता सासरच्या मंडळींनी तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी शिल्पाचा भाऊ पंकज शंकर दगडकर रा. हिरपूर ता. धामणगाव जि. अमरावती, उपस्थित होता. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: February 4, 2017 01:03 IST