शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाणार होती. मात्र कोरोनामुळे हा कालावधी मार्चच्या पुढे गेला. ही सर्व खाते एनपीएमध्ये गेली. यामुळे आरबीआयने अशा थकीत खात्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी कुठल्याही सूचना दिल्या नाही. यामुळे कर्जमुक्ती योजना थांबली आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्यांदाच यवतमाळात : आयुक्तांच्या मंजुरीनंतर सुटणार कर्जमुक्तीचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसएलबीसीने (स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी) कर्ज वितरणासाठी करारनाम्याचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जमुक्ती देण्यासाठी आयुक्तांकडे अ‍ॅग्रीमेंट पाठविले आहे. यामुळे जिल्हा बँकेचा कर्जमुक्तीचा तिढा सुटणार आहे. यातून बँकेने शेतकऱ्यांचे थम्ब अथेन्टीकेशन सुरू केले आहे. राज्यातील हे पहिले अ‍ॅग्रीमेंट असणार आहे.राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाणार होती. मात्र कोरोनामुळे हा कालावधी मार्चच्या पुढे गेला. ही सर्व खाते एनपीएमध्ये गेली. यामुळे आरबीआयने अशा थकीत खात्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी कुठल्याही सूचना दिल्या नाही. यामुळे कर्जमुक्ती योजना थांबली आहे.या संदर्भात राज्य शासनाने कर्ज वितरणाची हमी घेणारे अध्यादेश प्रसिद्ध केले. परंतु आरबीआयने कुठलीही हमी घेतली नाही. यामुळे जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वितरणाची प्रक्रिया थांबविली होती. यामधून जिल्ह्यातील एक लाख शेतकरी अडचणीत सापडले आहे. या शेतकºयांना साडेसातशे कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे.आता अ‍ॅग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आयुक्तांकडे अ‍ॅग्रीमेंट पाठविले आहे. यामध्ये १ एप्रिल २०२० पासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत कर्ज रकमेवर मुद्दलासह व्याजाची रक्कम देण्याचे स्पष्ट केले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत शासनाने ही रक्कम बँकेच्या खात्यात वळती न केल्यास राज्य शासनाविरोधात बँकेला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज रक्कम मिळण्याची हमी मिळाल्याने कर्ज वितरणास तयार झाली आहे. आता अ‍ॅग्रीमेंटवर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर हा दस्तावेज मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे येणार आहे.१८ हजार शेतकरी माफीच्या प्रतीक्षेतअ‍ॅग्रीमेंटचा हा कागद संचालक मंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. यानंतर कर्जमुक्ती प्रक्रियेला गती मिळणार आहे. तत्पूर्वी कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना थम्ब अथेन्टीकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ हजार शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांनी लगतच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपले थम्ब अ‍ॅथेन्टीकेशन करावे यामुळे अ‍ॅग्रीमेंट प्राप्त होताच कर्ज वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल.- अरविंद देशपांडेमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा सहकारी बँक, यवतमाळ.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज