शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

जिल्हा प्रशासनाचा करणार निषेध

By admin | Updated: August 3, 2015 02:21 IST

सेतू व नायब तहसीलदाराविरूद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी ...

वणी : सेतू व नायब तहसीलदाराविरूद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे. याबाबत दिलीप भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.मारेगाव येथील नायब तहसीलदारांनी शासनाची फसगत करून ते मुख्यालयी न राहता घरभाड्याची उचल करीत असल्याची तक्रार दिलीप भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तसेच जिल्ह्यातील सेतू सुविधाधारक कंपनी ही कंत्राटीचे अनेक नियम व उल्लंघन करून सेतू चालवित आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कंत्राट रद्द करावा. सेतू केंद्र हे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, सुशिक्षित बेरोजगार, दारिद्र्यरेषेखालील महिला व पुरूष बचत गटांना देण्यात यावे. सेतू सुविधा केंद्रातून आॅफलाईन सातबारा व आठ अ ची १८२ प्रमाणपत्रे वितरित केली आहे. परंतु या प्रमाणपत्राची रक्कम सेतूधारकांनी शासनाच्या खात्यात जमा न करता ती हडप केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. सेतूच्या सुविधांबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या गैरसोयीबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्याची दखलच घेण्यात आली नाही. हस्तलिखीत पावतीवर शासनाचे उलटे शिक्के मारून शासनाच्या राज्यस्तंभाचा अपमान येथील सेतू केंद्राने केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भोयर यांनी निवेदनातून केली आहे. सेतू सुविधा केंद्र व निवासी नायब तहसीलदार यांच्यावर शासनाकडून १२ आॅगस्टपर्यंत सक्त कारवाई न केल्यास नाईलाजास्तव येथील तहसील कार्यालयासमोर १५ आॅगस्टाला जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदविणार असल्याचे दिलीप भोयर यांनी निवेदनात म्हटले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)