शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

सरपंचांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावच्या प्रवेशिका सरपंच अवॉर्डसाठी दाखल झाल्या होत्या. यातून परिक्षकांनी पुरस्कारासाठी गावांची निवड केली. या सर्व सरपंचांना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.

ठळक मुद्देगावांच्या कर्तृत्वाचा गौरव : दर्डा मातोश्री सभागृहात शानदार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीतून गावाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या जिल्ह्यातील सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड - २०१९’ने रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गौरविले जाणार आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा देखणा सोहळा सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत केली जाणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार मदन येरावार, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार ख्वाजा बेग, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार नामदेव ससाने प्रामुख्याने उपस्थित राहतील. याशिवाय जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचीही या सोहळ्याला उपस्थिती लाभणार आहे.सरपंचांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावच्या प्रवेशिका सरपंच अवॉर्डसाठी दाखल झाल्या होत्या. यातून परिक्षकांनी पुरस्कारासाठी गावांची निवड केली. या सर्व सरपंचांना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. यवतमाळ येथे सलग दुसºया वर्षी हा सोहळा घेतला जात आहे. गावकºयांच्या साथीने सरपंच मंडळी गावाच्या विकासाकरिता जीवतोड मेहनत करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेतली जावी यासाठी सरपंच अवॉर्ड त्यांना प्रदान केला जाणार आहे.या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची पावती या रूपाने त्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बीकेटी टायर्स आहेत.१३ श्रेणीत पुरस्कारउदयोन्मुख नेतृत्त्व (नव्याने सरपंचपदी आलेले), पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, ग्रामरक्षण, ई-प्रशासन, आरोग्य, कृषी तंत्रज्ञ, पर्यावरण संवर्धन आदी १३ कॅटेगरीसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी लोकमत सरपंच अवॉर्डने गौरविले जाणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच