शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत सरपंच अवार्ड’चे १४ फेब्रुवारीला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:40 IST

‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे.

ठळक मुद्देग्रामविकासावर मार्गदर्शन : मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवस्टेप इन हॉटेल (मिडटाऊन हॉटेलजवळ) स्टेट बँक चौक, धामणगाव रोड, यवतमाळ येथे सकाळी ११ वाजता रंगणार सोहळा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे. तसेच यशदाचे मानद व्याख्याता नवनाथ गायकवाड ग्रामीण विकासावर मार्गदर्शन करणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर झुबेर शेख, नागपूरचे आॅथोरॉईजड् डिस्ट्रीब्युटर दीपक बानकोटी, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे टेरीटोरी मॅनेजर सागर शेळके, डेप्युटी जनरल मॅनेजर भालचंद्र माने, उमरखेडचे डिलर फय्यूम पटेल, यवतमाळचे डिलर राहुल सुराणा उपस्थित राहतील.गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना या सोहळ्यात ‘बीकेटी टायर्स प्रस्तूत लोकमत सरपंच अवार्ड’ने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बीकेटी टायर्स असून पतंजली आयुर्वेद प्रायोजक तर सहप्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स आहेत. जिल्हाभरातील सरपंचांनी सादर केलेल्या प्रस्तावातून तज्ज्ञ ज्युरींनी पुरस्काराची निवड केली. या आदर्श सरपंचांना गौरविले जाणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.ग्रामविकासावर मार्गदर्शन‘लोकमत सरपंच अवार्ड’ वितरण सोहळ्यात ग्रामविकास विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनीचे (यशदा) मानद व्याख्याता, संमोहन तज्ज्ञ, मोटीव्हेशनल स्पीकर नवनाथ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. नवनाथ गायकवाड यांचा ग्रामीण विकासावर दांडगा अभ्यास असून यशदामध्ये ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण विकासावर मार्गदर्शन करतात. अशा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी या सोहळ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील गावविकासाला दिशा देणाऱ्या सरपंचांना मिळणार आहे.