शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

वीज प्रकल्पांची हुलकावणी

By admin | Updated: December 31, 2014 23:31 IST

वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. चार ते पाच वीज निर्मिती प्रकल्प येणार असल्याच्या वावड्या सतत उठविण्यात आल्या.

भारनियमनाचा ताप : खनिज संपत्तीचा लाभ होतोय दुसऱ्यांनाचवणी : वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. चार ते पाच वीज निर्मिती प्रकल्प येणार असल्याच्या वावड्या सतत उठविण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात एकही वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला नाही. तालुक्यात वीज प्रकल्प कधी साकारणार, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.वीज ही जीवनावश्यक बाब झाली आहे. घरोघरी आणि खेडोपाडी वीज पोहोचली आहे. बोटावर मोजण्याईतपत गावातच वीज पोहोचली नाही. परिणामी राज्यात विजेला प्रचंड मागणी आहे. मात्र त्या तुलनेत वीज निर्मिती होत नसल्याने ग्राहकांना विजेचा तुटवडा भासतो. परिणामी जनतेला भारनियमनाशी झुंज द्यावी लागते. उन्हाळ्यात ग्रामीण भाग तर भारनियमनाने अक्षरश: होरपळून निघतो. ग्रामीण भागातील लघु व्यावसायीक भारनियमनाने आर्थिक संकटात सापडतात. अनेकांचे व्यवसाय दिवसा बंद राहातात. जनतेलाही अंधाराचा सामना करावा लागतो. जनतेला भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी नवे वीज प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तथापि त्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. वणी परिसरात वीज निर्मितीसाठी आवश्यक दगडी कोळशाचा मुबलक साठा आहे. मात्र येथे वीज निर्मिती होत नाही. परिसरात वेकोलिच्या जवळपास १२ खुल्या आणि भूमिगत कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून दररोज लाखो टन कोळसा बाहेर काढला जातो. तोच कोळसा येथील रेल्वे सायडींगवरून रेल्वेद्वारे राज्यातील वीज प्रकल्पांना पाठविला जातो. कोळसा येथून परराज्यातही जातो. अनेक वीज निर्मिती प्रकल्पांनाही हा कोळसा पुरविला जातो. मात्र वणी परिसरात अद्याप एकही वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला नाही. वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, हेच जनतेला कळत नाही. तालुक्यात दोन मोठ्या व दोन लहान, अशा चार नद्या आहेत. शिवाय इतर नाले आहेत. कोळसा खाणींतूनही भरपूर पाणी बाहेर फेकले जाते. नद्यांवर धरणे बांधण्यात आली, तर वीज निर्मिती प्रकल्पांना लागणारे पाणीही मुबलक आणि सहज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांचे पाणी अडविणे गरजेचे आहे. नैसर्गिक सुबत्ता असतानाही तालुक्यात वीज प्रकल्प सुरू करण्यास प्रचंड उदासीनता दिसत आहे. काही खासगी कंपन्यांनी वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी तीन कंपन्यांना केंद्र शासनाने मंजुरीही दिली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले कुणालाच काही कळले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)