शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:39 IST

नळाचे पाणी न आल्याने संतप्त झालेल्या सत्तारुढ गटाच्या नगरसेवकाने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड करण्याची घटना दिग्रस येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. तसेच पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिग्रस नगर परिषद : अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, नगरसेवकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नळाचे पाणी न आल्याने संतप्त झालेल्या सत्तारुढ गटाच्या नगरसेवकाने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड करण्याची घटना दिग्रस येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. तसेच पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मोतीनगर भागात सोमवारी नळाचे पाणी आले नाही. याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक सय्यद अक्रम सै. उमर नगरपरिषद कार्यालयात आले. त्या ठिकाणी त्यांनी पाणीपुरवठा विभागात जाब विचारला. पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता गौरव मांडळे व वॉलमनशी हुज्जत घालणे सुरू केले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी कार्यालयातील खुर्च्याची फेकाफेक करून टेबलवरील काच फोडला. तसेच कनिष्ठ अभियंत्याला धक्काबुक्की केली. यामुळे नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर गौरव मांडळे यांनी दिग्रस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दिग्रस पोलीस करीत आहे.