शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोबदल्याने घराघरांत भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शेतकऱ्याने याच पैशाच्या वादातून झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. विभक्त कुटुंबांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. काहींनी मतभेद समुपचाराने मिटविले.

संजय भगत लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर हा महामार्ग महागाव तालुक्यातून गेला आहे. त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यावरून घराघरांत भांडणे लागली आहेत. पैशाच्या वाटणीवरून काहींना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. महागाव ते भोसा आणि महागाव ते नांदगाव असा प्रत्येकी २० म्हणजेच एकूण ४० किलोमीटरचा हा महामार्ग तालुक्यातून गेला आहे. वारंगा ते महागाव आणि महागाव ते नागपूर असा हा मार्ग दोन कंपन्यांकडे बांधकामासाठी सोपविण्यात आला. महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शेतकऱ्याने याच पैशाच्या वादातून झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. विभक्त कुटुंबांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. काहींनी मतभेद समुपचाराने मिटविले. मात्र काहींनी मिळालेल्या मोबदल्याचा दुरूपयोगी केल्याचे दिसून येते. मात्र या बक्कळ पैशाने अनेक घरांमध्ये ठिणगी पडून कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. 

७० शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतजमिनीचा मोबदला कमी मिळाल्यामुळे ७० शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे हिवरा संगम येथील ११ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आहे त्याच रस्त्यावरून महामार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली. याशिवाय इतर १४ शेतकरीही बायपासला विरोध म्हणून न्यायालयात गेले आहेत.

अपघाताची मालिका सुरूचमोबदल्याचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. संबंधित शेतकऱ्यांसोबत प्रशासन चर्चा करण्यास तयार नाही. या रस्त्याची डागडुजीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे या दोन किलोमीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत आहे. त्यात आतापर्यंत काहींचे बळी गेले आहे. 

विहीर, हातपंपांची नोंदच घेतली नाहीमहामार्गासाठी जमीन संपादित करताना बांधकाम, विहिरी, हातपंप, दुकाने आदींची नोंदच घेण्यात आली नाही. पंचनाम्यातून ही कामे वगळण्यात आली. त्यामुळे अंबोडा येथील अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात मोबदला मिळाला. विहीर, हातपंप आणि इतर वस्तूंच्या नुकसानीची पंचनाम्यात नोंद घेतली गेली असती तर लाभार्थ्यांना जादा प्रमाणात मोबदला मिळाला असता. मात्र पंचनामा करताना या बाबी वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

  प्रकल्पग्रस्त म्हणतात...  

मोजणीमधून जागा सुटली. त्यामुळे पुन्हा मोजणीची मागणी केली. काऊरवाडी, खडका, दहीसावळी, भोसा, वाघनख, अंबोडा येथील ७० शेतकरी लाभापासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.- हनवतराव देशमुख, अंबोडा 

जमिनीच्या मोबदल्याची काही प्रकरणे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली. मात्र नॅशनल हायवेने अमान्य केली. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. - पंजाबराव देशमुख खडकेकर, खडका

हिवरा बायपासमधील जमिनी बंजर दाखविण्यात आल्या. प्रत्यक्षात त्या ओलिताखाली आहे. त्यामुळे आम्ही १४ शेतकरी न्यायालयात गेलो. बायपासला आमचा विरोध आहे. ११ शेतकरी रस्ता गावामधून नेण्यासाठी न्यायालयात गेले आहे. - प्रा. मुकुंद पांडे, हिवरा संगम

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग