शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपालिका बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 21:57 IST

नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर टीमच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘आम्ही यवतमाळकर’ची मागणी : आर्थिक अनियमितता बोकाळल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर टीमच्यावतीने करण्यात आली आहे.शहरातील सफाईचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिले असून वित्तीय मान्यता न घेता कंत्राटदारास काम बहाल केले. पालिका फंडाचा पैसा यावर खर्च झाल्याने शहरातील मुलभूत सुविधेची कामे खोळंबली आहेत. कंत्राटदाराने काम बंद केल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सफाईचे कंत्राट लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करत ६५:३५ या टक्केवारीत विभागून दिले आहे. शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. ओला व सुका कचरा एकत्र जमा करून धामणगाव रोड ते नागपूर बायपास परिसरातील शासकीय खुल्या जागेत डम्प केला जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून व घनकचरा व्यवस्थापन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरात साथीचे आजार उद्भवण्याची भीती आहे. दलित वस्ती निधी अंतर्गत गैरदलित वस्तीमध्ये कामे केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ३०८ अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. तरीसुद्धा नव्याने वर्क आॅर्डर देऊन काम केले जात आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून येते. यामुळे शहराच्या हितासाठी नगरपरिषद सत्ता बरखास्त करावी व येथील कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आम्ही यवतमाळकर टीमचे जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, अमित मिश्रा, सैयद सोहराब, अ‍ॅड. बिपीन ठाकरे, अ‍ॅड. आकाश मंगतानी, अ‍ॅड. निरंजन दाढे, अ‍ॅड. मुकेश श्रीवास, अ‍ॅड. इम्रान देशमुख उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका