शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा सभापतिपदासाठी तीन सदस्यांची नावे चर्चेत

By admin | Updated: March 13, 2017 01:00 IST

पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मंगळवार, १४ मार्च रोजी होणाऱ्या सभापती, ....

पंचायत समिती : महिला राखीव, संधी कुणाला मिळणार ? मुकेश इंगोले   दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मंगळवार, १४ मार्च रोजी होणाऱ्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत या दोनही पदांवर कुणाची वर्णी लागणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सहाही सदस्य दावेदार आहेत. मात्र सर्व समीकरण पाहता तीन महिला सदस्यांच्या नावाची चर्चा आहे, तर उपसभापती पदासाठी तीन पुरुष सदस्यांचा पर्याय आहे. यापैकी कुणाची निवड केली जाते, की या पदाची संधीसुद्धा महिलेला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दहा सदस्यीय दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पदाधिकारी याच पक्षाचे होणार आहे. सभापती पदासाठी सुनीता राऊत, सिंधुताई राठोड व उषा चव्हाण यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सुनीता राऊत या लोही या सर्वसाधारण गटातून निवडून आल्या आहे. त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष होत्या. परंतु त्यांनी निवडणुकीपूर्वीच सेनेत प्रवेश केला. लोहीच्या सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर तालुक्यात बचत गटामध्ये त्यांचे मोठे काम आहे. शिवाय जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास उत्सुक असताना पंचायत समिती लढवायला लावून त्यांना सभापतिपदाचा शब्द दिल्याचा दावा केला जात आहे. तळेगाव गणाच्या सदस्य सिंधुताई राठोड या तळेगावच्या ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यांना राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांच्या इतरही जमेच्या बाजू असल्याने त्यांच्या नावाचा विचार होवू शकतो. उषा चव्हाण यांनी मोठ्या लढाईत बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांना सभापतिपदाचे बक्षीस मिळते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. उपसभापती पदाकरिता पंडित राठोड, नामदेव जाधव, साहेबराव कराळे आदींचा पर्याय आहे. त्यामुळे यापैकी कुणाची वर्णी लागते की या पदावरसुद्धा महिला सदस्याला संधी देवून पंचायत समितीवर महिलाराज आणले जाते, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. या दोनही पदांबाबतचा अंतिम निर्णय महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हातात आहे. ही नावे निश्चित करताना जिल्हा परिषदेत तालुक्यातील कोणत्या गटाला प्रतिनिधित्व मिळते, त्याचबरोबर जातीय समीकरण आणि गटाचा बॅलन्स साधला जाईल, त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारतो, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.