शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत विजेने महागाव वैतागले

By admin | Updated: June 19, 2017 00:48 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, साधी वाऱ्याची झुळक आली तरी वीज पुरवठा खंडीत होतो.

अंधाराचे साम्राज्य : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, साधी वाऱ्याची झुळक आली तरी वीज पुरवठा खंडीत होतो. शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. परिणामी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. यामुळे वीज ग्राहकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महागाव तालुक्यातील वीज वितरणचा कारभार गेल्या काही दिवसांपासून ढेपाळला आहे. शहर आणि ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा होत आहे. गत आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तर शहरातील ट्रान्सफार्मरचे स्फोट होण्याचे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी येथील तहसील कार्यालयासमोरील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला होता. त्यात दोन महिला जखमी झाल्या. या प्रकाराकडेही वीज वितरणने दुर्लक्ष केले आहे. महागाव, गुंज, काळी दौ., अनंतवाडी, मुडाना, फुलसावंगी येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र आहे. परंतु हे केंद्र केवळ शोभेची वास्तू झाले आहे. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जितेश गजभिये यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणाला आळा बसला होता. परंतु त्यांची बदली राळेगाव येथे करण्यात आली. त्यामुळे पूर्वीसारखीच अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांसह लघुउद्योगांनाही त्याचा फटका बसतो. बँकांचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने व्यवहार ठप्प होतात. कर्मचारी मुख्यालयी राहात ााहीत. परिणामी महागाव शहरातील ग्राहकांसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आज शिवसेनेचे आंदोलन वीज वितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. शिवसेनेचे रामराव पाटील यांच्या नेतृत्वा वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन केले जाणार आहे. तसेच जनुना येथील गावकरीही या आंदोलनात सहभागी होणार आहे. जनुना येथे उच्च दाबाने अनेकांचे मीटर व विद्युत उपकरणे भस्मसात झाली होती. या आंदोलनात शिवसैनिक सहभागी होणार असून, वीज वितरण कार्यालयाला घेराव घालणार आहेत.