लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी यवतमाळ शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात येऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे आदेश बुधवारी दिले. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली.या कायदाअंतर्गत औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री केल्यास, औषधांची साठेबाजी करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. चुकीचे समज पसरविणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश सनियंत्रक यांना दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेवून त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघु कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये, यासाठी उपाययोजना आखणे, आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे पालन करणे स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवणे, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेशात नमूद केले आहे.स्वतंत्र माहिती व मदत कक्षकोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वीत आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक ९१-११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे या जबाबदाºयादेखील सनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात येऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे आदेश बुधवारी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
ठळक मुद्देखासगी रुग्णालयांचे अधिग्रहण : टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित