शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्षांची आमदारांना भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:47 IST

राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकांचन चौधरी : म्हणून होतो हस्तक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे असे आमदार आपापल्या मतदारसंघातील नगराध्यक्षांच्या कामात सतत हस्तक्षेप करून त्यांची अडवणूक करण्याचे काम करीत आहे. विशेषत: भाजपाचेच सर्वाधिक नगराध्यक्ष आणि आमदार असतानाही हे घडत आहे. ही बाब परिषदेच्या आयोजकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही मी परिषदेत केली, असे चौधरी यांनी सांगितले.खासदार, आमदारांसारखा नगराध्यक्षांनाही हवा फंडथेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला खरेतर सभागृहात काही विशेषाधिकार असण्याची गरज आहे. मात्र तसे झालेले नाही. उलट अध्यक्षांचे अधिकार कमी करण्यात आलेले आहे. यवतमाळ पालिकेत तर मी नगराध्यक्ष असले तरी जादा नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आहे. त्या बळावर महिला पदाधिकारी म्हणून माझी प्रत्येक विषयात अडवणूक केली जात आहे. जनतेने जर मला निवडून दिले आहे, तर जनतेची कामे पूर्णत्वास नेणे हे माझे कर्तव्य आहे. थेट जनतेतून जाणाऱ्या आमदार, खासदारांना मतदारसंघात खर्च करण्यासाठी निधी दिला जातो. तसेच फंड यापुढे नगराध्यक्षांनाही मिळणे गरजेचे आहे, असा प्रस्ताव परिषदेत मांडल्याची माहिती नगराध्यक्ष चौधरी यांनी दिली.नगराध्यक्षांना द्यावा पीआरओनगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी महिला पदाधिकाऱ्याच्या सक्षमतेसाठी परिषदेत चार प्रस्ताव ठेवले. पहिला प्रस्ताव होता, नगराध्यक्षांना जनसंपर्क अधिकारी मिळण्याचा. त्यासाठी त्यांनी यवतमाळ पालिकेतील उदाहरणे सर्वांपुढे ठेवली. येथील सभापती परस्पर प्रेसनोट काढून चुकीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवितात. एखादी घोषणा करण्याचा त्यांना अधिकार नसतानाही ते घोषणा करतात. त्यामुळे नगराध्यक्षांचा पीआरओ आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दुसरा प्रस्ताव त्यांनी विशेषाधिकारासाठी ठेवला. अर्थसंकल्पीय सभा, स्थायी समितीची सभा अशा कोणत्याही सभेत नगराध्यक्षांना विशेषाधिकार मिळण्याची मागणी परिषदेत करण्यात आली. नगराध्यक्षांचे आर्थिक आणि प्रशासनिक अधिकार पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे, तसेच त्यांना आमदारांप्रमाणे निधी देण्यात यावा, असेही प्रस्ताव चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष