शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या ‘हवाला’चे थेट गुजरात ‘कनेक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला जात आहे. यवतमाळात हवालाच्या व्यवहारातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. यासाठी कोणी कुरिअर-पार्सल व्यवसायाचा तर कोणी सहज कुणाला संशयही येणार नाही, अशा व्यवसायाआडून हवालाचे हे रॅकेट चालवित आहेत.

ठळक मुद्देप्राप्तीकर विभागापुढे खुले आव्हान : राम मंदिर रोड, जाजू चौक प्रमुख केंद्र, दरदिवशी कोट्यवधींची ‘उलाढाल’

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : करातील चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहारांवर जोर देत असताना  ‘प्राप्तीकर’ विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून पार्सलच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या ‘हवाला’ रकमेची ‘उलाढाल’ यवतमाळात सुरू आहे. खास गुजरात कनेक्शनमधून ही उलाढाल केली जात आहे. काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला जात आहे. यवतमाळात हवालाच्या व्यवहारातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. यासाठी कोणी कुरिअर-पार्सल व्यवसायाचा तर कोणी सहज कुणाला संशयही येणार नाही, अशा व्यवसायाआडून हवालाचे हे रॅकेट चालवित आहेत. यवतमाळात हवालाचे अनेक पॉईंट आहेत. मात्र,अलीकडे तेथील उलाढाल मंदावली आहे. परंतु, सध्या जाजू चौक ते दत्त चौक मार्गावरील एक दुकान आणि मुख्य बाजारपेठेतील राम मंदिर  रोडवरील एका दुकानातून सध्या सर्वाधिक उलाढाल केली जात आहे. सध्या दोन ठिकाणांवरून व्यवहार चालविणारे दोघे पूर्वी एकत्र होते. यातील एक जण अमरावतीवरून यायचा. एकाच दुकानात बसून दोघांचेही हवालाचे व्यवसाय चालायचे. नंतर दोघेही वेगळे झाले. एकाने दत्त चौकातील भाजी मंडी परिसरात दुकान थाटले. तेथे व्यवसायात आलेली भरभराट पाहून त्याने आता राम मंदिर परिसरात आपले बस्तान मांडले आहे. या हवाला व्यावसायिकांचे कनेक्शन थेट गुजरातमध्ये आहे. याशिवाय मुंबई, दिल्लीतूनही संपर्क होतो. गुजरातमध्ये हवाला व्यवसायाला मंजुरी असली तरी महाराष्ट्रात अद्याप ती मिळालेली नाही. त्यामुळे राज्यात हा व्यवसाय अनधिकृत म्हणून गणला जातो. जाजू चौकातील ‘कांती’ कनेक्शन थेट गुजरातेत असून त्या माध्यमातून हवालाचा व्यवहार ‘चोख’ करण्याचा प्रयत्न होत आहे. तर राम मंदिर परिसरातून ‘व्ही-आय-पी’ पद्धतीने हा व्यवहार चालविला जातो. एका लाखाला ५०० तर एका कोटीला ५० हजार रुपये कमिशन आकारले जाते. अशा पद्धतीने सर्रास कोट्यवधींची उलाढाल हवालाच्या माध्यमातून केली जाते.पार्सल, सोने-चांदी, रोकड काही ठिकाणी प्रत्यक्ष पार्सल सेवा, सोने-चांदी आणि हवाला रक्कम हे तीनही पॅटर्न चालविले जातात. मात्र जाजू चौकात केवळ हवाला तर राम मंदिर रोड परिसरात हवालासोबतच छुटपुट पार्सल सेवाही (केवळ दाखविण्यासाठी) चालविली जाते. यवतमाळसारख्या ग्रामीण जिल्हा मुख्यालयी केवळ हवालातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना प्राप्तीकर विभाग अनभिज्ञ कसा, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. हवालाचे हे रॅकेट प्राप्तीकर खात्यासाठी खुले आव्हान ठरले आहे. यापूर्वी काही हवाला प्रकरणे पोलीस रेकॉर्डवरही आली आहेत. त्यातून यवतमाळातून हवाला रॅकेट चालविले जात असल्याचे सिद्धही झाले आहे.

‘रोकड’ पोहोचविण्यासाठी रेल्वे, ट्रॅव्हल्स, कारचा वापर  हवालातील रक्कम प्रत्यक्ष पोहोचविण्यासाठी कधी रेल्वेचा तर कधी स्पेशल वाहनाचा वापर केला जातो. रेल्वेमध्ये त्यासाठी खास पार्सल पास बनविली जाते. ही पासच ओळख असल्याने हवालाचा माल सुखरुप पाहिजे तेथे पोहोचविला जातो. अनेकदा  खासगी बसेसच्या माध्यमातूनही रोकड पाठविली जाते.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स