शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात बचतगटांच्या कन्यारत्नांना थेट नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 12:09 IST

बचतीच्या माध्यमातून एक नवा इतिहास घडविणाऱ्या महिलांच्या कन्यारत्नांना थेट नोकरी देण्याचा प्रयोग राज्यात राबविला जाणार आहे. पहिल्या प्रयोगाची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे.

ठळक मुद्देगुडग्राममध्ये प्रशिक्षण राज्यातला पहिला प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बचतीच्या माध्यमातून एक नवा इतिहास घडविणाऱ्या महिलांच्या कन्यारत्नांना थेट नोकरी देण्याचा प्रयोग राज्यात राबविला जाणार आहे. पहिल्या प्रयोगाची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी खासगी कंपनीने उचलली आहे. नोकरीही देण्याचे अ‍ॅग्रीमेंट केले आहे. त्यामुळे महिला बचतगटातील महिलांच्या कन्यारत्नांना आत्मविश्वासाचे बळ मिळणार आहे. दिल्लीमधील गुडग्राममध्ये हे प्रशिक्षण होणार आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य कुटुंबांची अवस्थाही चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. अशा परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासोबत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न कायम आहे. या प्रश्नावर मात करता यावी म्हणून बचतगटांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी उद्योगांचे कर्ज दिले जात आहे.यासोबतच शिक्षित मुलींना नोकरी मिळावी म्हणून गावखेड्यात धावपळ सुरू आहे. मात्र त्यांना नोकरीची संधी मिळत नाही. अशा मुली हताश होतात. यावर मात करण्यासाठी जेमतेम बारावी शिक्षण उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना नोकरी देण्यासाठी खासगी कंपनी पुढे आली आहे. टूव्हीलर क्षेत्रात मोठे नाव असलेल्या या कंपनीत अशा मुलींना नोकरी दिली जाणार आहे. तत्पूर्वी त्यांना या क्षेत्रात काम करता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाहनाचे पार्ट जोडण्यासोबत वाहन दुरूस्ती करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या खासगी कंपनीमध्ये देशभरातील विविध निर्मिती केंद्र किंवा गृहजिल्ह्यात या मुलींना नोकरी दिली जाणार आहे. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनीच उचलणार आहे. १०० मुलींची एक बॅच राहणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नेतृत्वात हे कामकाज पार पडणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण तयारी महिला आर्थिक विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. मुलींची निवड प्रक्रियाही पार पडली आहे.

बचतगट महिलांच्या कन्यारत्नांना नोकरीसाठी खासगी कंपनीने होकार दिला आहे. त्यानुसार १०० मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिल्लीजवळील गुडग्राममध्ये मुलींना प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे.- डॉ. रंजन वानखडे,वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ

टॅग्स :Governmentसरकार