लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघांपैकी एक रुग्ण दिग्रस तर दुसरा दारव्हा येथील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर दिवसभरात एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला.सध्या जिल्ह्यात आठ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे. या आठ पैकी दोन रुग्ण अन्य जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी एकूण १२८१ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह तर उर्वरित १२७९ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची एकूण संख्या ७२ हजार ८२२ झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७१ हजार २२७ इतकी आहे. आतापर्यंत सात लाख ७ हजार ७२५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा लाख ३४ हजार ४९२ अहवाल निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर १०.२९ असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर ०.१६ तर मृत्यूदर २.४५ आहे.
डेल्टाने काळजी वाढविली- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएन्टचे १८ रुग्ण आढळून आले. हे रुग्ण आता बरे झालेले असले तरी डेल्टाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनीही मास्क आणि एकमेकातील अंतराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.