शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनात निकषाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:22 IST

शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअंतराची अट : नेर तालुक्यातील सरकारी विहिरींचे वांदे

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे. नेर तालुक्यात सदर योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ९२ विहीरी रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत झालेले पंचनामे यामुळेही ९२ लाभार्थी योजनेला मुकण्याची भीती आहे.नेर तालुक्यासाठी धडक सिंचन योजने अंतर्गत ३०० विहिरी मंजूर झाल्या आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. २९२ लाभार्थी निवडले गेले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी योजनेचे निकष पाळले गेले नाही. परिणामी आता ९२ लाभार्थी या योजनेपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका विहिरीपासून दुसऱ्यां विहिरीचे अंतर ५०० फूट असणे आवश्यक आहे. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाळली नाही. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या जागेचे पंचनामेही करण्यात आले. आतामात्र ५०० फूट अंतराचे निकष पुढे आणले आहे. ज्या गावात पाणीपुरवठा नळ योजनेची विहिर आहे तेथून १६५० फूट अंतरावर धडक सिंचन विहिर नसावी हा ही निकष आहे.लाभार्थी निवडीनंतर निकष पुढे आणले आहे. वास्तविक शेतकºयांनी निश्चित केलेल्या जागेचे पंचनामे करतानाच याबाबीची दक्षता घेणे अपेक्षित होते. निकषाच्या याच बडग्यामुळे उमरठा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मीना भुसारे यांना मंजूर झालेली विहीर रद्द करण्यात आली आहे. ५०० फुटाच्या आत जागा निश्चित केल्याच्या कारणावरून ही विहीर रद्द करण्यात आली आहे. फत्तापूर येथील हरिहर जवके यांच्या अनुपस्थितीत विहिरीचा पंचनामा करण्यात आला आहे. असे अनेक प्रकार तालुक्यात घडले आहे.अनेक प्रश्न कायमधडक सिंचन विहिरीचे लाभार्थी निवडण्यासाठी ५०० फूट अंतराची अट शेतकºयांना आधी का सांगितल्या गेली नाही. एकाचवेळी ९२ लाभार्थी नामंजूर कसे होतात, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. बसल्या जागेवर पंचनामे केले गेले हे यावरून स्पष्ट होते. यात योजनेची मात्र वाट लागत आहे.