शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

बोथबोडनमध्ये डायरियाची साथ

By admin | Updated: June 28, 2015 00:13 IST

अशुद्ध पाणी प्राशनाने यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे गत तीन दिवसांपासून डायरियाचे थैमान सुरू असून,

डझनावर रूग्ण : अशुध्द पाणी, आरोग्य पथक दाखलयवतमाळ : अशुद्ध पाणी प्राशनाने यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे गत तीन दिवसांपासून डायरियाचे थैमान सुरू असून, डझनावर नागरिकांना याची लागण झाली आहे. अनेक रुग्णांवर यवतमाळच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोग्य विभागाने गावातही शिबिर उघडले आहे. यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे बुधवारी रात्री अचानक अनेकांना उलटी आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेकांना हाच त्रास सुरू झाला. त्यामुळे या बाबीची माहिती हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. पी.जे. नागभिडकर सध्या बोथबोडन येथे तळ ठोकून आहेत. समाज भवनात दवाखाना उघडून रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र रुग्णांची प्रकृती आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे सुमित्रा वासुदेव राठोड, विमल विष्णू चव्हाण, कांचन माघाडे, उमा विजय शेळके, अरुणा राजू राठोड यांच्यासह अनेक रुग्णांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. बोथबोडन सोबतच हेटी आणि कोलाम पोडावरही डायरियाची साथ सुरू आहे. नळयोजनेला येणारे पाणी तलावातून सरळ विहिरीत आणि तेथून नागरिकांच्या घरी पोहोचते. पाणी शुद्धिकरणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना डायरियाची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंच दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गावात स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी माजी सरपंच अनुप चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी मदत केली. (प्रतिनिधी)