शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डीएचओची पाटणबोरीच्या खासगी दवाखान्यावर धाड

By admin | Updated: March 19, 2017 01:35 IST

जिल्हा आरोग्य विभाग यवतमाळच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.मनोज रामराव बडोदेकर

अवैध गर्भपात : औषधी जप्त, डॉक्टर दाम्पत्त्याविरूध्द गुन्हा मुकुटबन : जिल्हा आरोग्य विभाग यवतमाळच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.मनोज रामराव बडोदेकर यांच्या खासगी दवाखान्यावर धाड टाकून गर्भपाताची औषधी जप्त केली. याप्रकरणी डॉ.मनोज बडोदेकर, त्यांची पत्नी डॉ.सुरेखा बडोदेकर व औषधी दुकानचालक नवीन धुम्मडवार यांच्याविरूद्ध मेडीकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्टनुसार मुकुटबन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील डॉ.बडोदेकर याच्या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची टीप जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार आरोग्य विभागाचे पथक प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.किसन राठोड, साथरोग अधिकारी डॉ.किशोर कोशटवार, ड्रग्स अधिकारी डॉ.राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.टी.जी.घोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक के.डी.भगत यांचे पथक खासगी दवाखान्याजवळ पोहोचले. मात्र रात्री ८.३० वाजता दवाखाना बंद होता. त्यामुळे डॉ.बडोदेकर यांना पथकाने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून दवाखाना उघडण्यास सांगितले. दवाखाना उघडल्यावर या पथकाने तपासणी केली असता, आतमध्ये सिझर, ५० सलाईन, १०० प्रेगाकीट, ३०० डिस्पोजल सिरींग्ज, ४०० वेगवेगळ्या निडल्स आढळून आल्या. त्यानंतर लगतच्या औषधी दुकानचालक नवीन बापूराव धुम्मडवार याला बोलावून मेडीकल उघडण्यास सांगितले. यावेळी मेडीकलची तपासणी केली असता, आतमध्ये अवैध गर्भपात संदर्भातील औषधे, मेडीसीन कॉस्को स्पेकुलम, मेसी प्रोस्टेट गर्भपाताची औषधे, सिझर, निडल, होल्डर, वैद्यकीय व्यवसाय करण्याचे साहित्य आढळून आले. एवढेच नव्हे तर दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर सुसज्ज बेडरूम असून तेथे बेड व बाथरूमची व्यवस्था केल्याचेही पथकाला आढळून आले. यावरून पथकाचा संशय आणखी बळावला. यावेळी पथकाने डॉ.बेडोदेकर यांना कागदपत्रे मागितली असता, डॉ.मनोजर बेडोदेकर हे बी.एच.एम.एस. व त्याची पत्नी डॉ.सुरेखा मनोज बेडोदेकर ही बी.ए.एम.एस. आहे. मात्र त्यांच्या दवाखान्यासमोरील बोर्डावर प्रसृती गृह, वंधत्व निवारण, भरती सेवा, नेबुलायझेशन असे लिहीलेले आढळले. वास्तविक ते प्रसृती संदर्भात कोणतीही वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही. त्यांच्याकडे गर्भपात करण्यासंदर्भात परवाना नसताना अवैध गर्भपात करत असल्याचे तपासणीत सिद्ध करण्यात आले आहे. त्यांचे हे कृत्य मेडकील टर्मिनेशन अ‍ॅक्ट १९७१ कलम ५ प्रमाणे गुन्हा असल्याची फिर्याद डॉ.के.झेड.राठोड यांनी मुकुटबन पोलिसात दिली. याप्रकरणी आरोपी डॉ.बडोदेकर दाम्पत्य व मेडीकलचालक नविन घुम्मडवारविरूद्ध मेडीकल प्रॅक्टीशन अ‍ॅक्ट १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कारवाईनंतर हे तिघेही फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)