शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

शालेय क्रीडा स्पर्धांची आजपासून धूम

By admin | Updated: July 26, 2016 00:07 IST

शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या शालेय क्रीडा स्पर्धांना मंगळवार, २६ जुलैपासून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामन्याने सुरुवात होणार आहे.

७९ खेळ प्रकारांचा समावेश : चार महिने विद्यार्थी गाजविणार मैदान, विविध वयोगटयवतमाळ : शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या शालेय क्रीडा स्पर्धांना मंगळवार, २६ जुलैपासून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामन्याने सुरुवात होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी या स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींसाठी असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत यावर्षी तब्बल ७९ खेळांचे आयोजन होणार आहे. यापैकी ४० खेळांना शासनातर्फे तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येक खेळासाठी अनुक्रमे तालुकास्तरावर दहा हजार रुपये, तर जिल्हास्तरावर १५ हजार रुपये अनुदान दिले जाते. उर्वरित खेळांच्या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संबंधित खेळाच्या एकविध क्रीडा संघटनांकडे सोपविली जाते. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामने २६ ते ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. बहुतांश क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, नेहरू स्टेडियम येथे होणार आहे.फुटबॉल, नेटबॉल, सिकई मार्शल आर्ट, जलतरण, कुडो, टेनीक्वाईट, कराटे, लगोरी, वेट लिफ्टिंग, मल्लखांब, बॉक्सिंग, पॉवर लिफ्टिंग, नेहरू कप हॉकी, कुडो मार्शल आर्ट, कॅनार्इंग कोनार्इंग, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, जम्प रोप, सॅपक टकरा, पेन्ट्याक्यू, हाफ किडो बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, कुराश, स्पिड बॉल, जित कुने दो, फ्लोअर बॉल, कुस्ती फ्री स्टाईल, कुस्ती ग्रिको रोमन, ट्रेडिशनल रेसलिंग, थांगता मार्शल आर्ट, सॉफ्ट टेनिस, स्क्वॅश, म्युझिकल चेअर, पिकल बॉल, टेनिस व्हॉलिबॉल, बॉल बॅडमिंटन, वूड बॉल, रोप स्किपिंग, डॉज बॉल, आष्टेडू आखाडा, हॉकी, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, लॉन टेनिस, वुशू, ज्युदो, सॉफ्टबॉल, सिलम्बंब, लंगडी, खो-खो, तायक्वांदो, रोल बॉल, हँडबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, शूटिंग बॉल, बास्केट बॉल, रायफल शूटिंग, रग्बी, स्पोर्ट डान्स, टेबल टेनिस, योगासन, क्रिकेट, सायकलींग, टेंगसुडो, मोन्टेक्स बॉल, रस्सीखेच, आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, तलवारबाजी, फुटबॉल टेनिस, चॉयक्वांदो आदी खेळांच्या स्पर्धा होतील. (क्रीडा प्रतिनिधी)