शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नेर पालिकेसाठी आज धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:14 IST

येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे९३ उमेदवार : १८ जागा, २९ बूथ, २० हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यासाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी शहरात २९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रांवर दहा हजार ७३ पुरुष, तर दहा हजार ४० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी २९ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय १८ नगरसेवक पदांसाठी रणसंग्राम होत आहे. सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासले आहे. दुखावलेले कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने तर चॅनलसमोर बंडखोरी व नाराजीचे उघड समर्थन केले. सर्वच पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. मतदारही यामुळे संभ्रमात पडले आहे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहे. भाजपाने शिवसेनेला टार्गेट करीत वैयक्तिक आरोपांचा सपाटा लावला होता. मात्र भाजपातील संजय देशमुख गट प्रचाराच्या बाहेर आहे. शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. काँग्रेसलाही बंडखोरीची लागण झाली आहे. या सर्वच पक्षांचे नाराज कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.सहा केंद्र संवेदनशीलनिवडणुकीसाठी २९ केंद्रांवर प्रत्येकी पाच मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आदेश दिले आहे. याशिवाय निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी २९ पैकी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगितले. या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणेदार अनिल किनगे बंदोबस्तावर नजर ठेऊन आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक