धम्माची छत्रछाया : बुद्धपौर्णिमेनिमित्त यवतमाळात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून रॅली काढण्यात आली. यावेळी एका रांगेत निघालेल्या बौद्ध भिक्खूंच्या शिरावर पंचशील ध्वजासारखी दिसणारी छत्री लक्षवेधी ठरली. बुद्धांच्या विचारांची सावली नव्या पिढीलाही नवी दिशा दाखविणार, असाच संदेश यातून देण्यात आला.
धम्माची छत्रछाया :
By admin | Updated: May 11, 2017 00:58 IST