शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

मुकुटबन येथे महावितरणवर धडकला मोर्चा

By admin | Updated: June 12, 2016 02:11 IST

महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील जन युवा मंच व नागरिकांनी शनिवारी बसस्थानक परिसरातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

अधिकाऱ्यांना निवेदन : युवा मंचने घेतला पुढाकार, गावपुढाऱ्यांनी दाखविली मोर्चांला पाठमुकुटबन : महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील जन युवा मंच व नागरिकांनी शनिवारी बसस्थानक परिसरातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शनिवारी सकाळी येथील बसस्थानक चौकातून हा धडक मोर्चा निघाला. मोर्चेकरी वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यानंतर पांढरकवडा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.जे.कटारे यांना १५ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी मोर्चकऱ्यांना मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व जन युवा मंचचे अध्यक्ष डॉ.मनोज बदोडेकर, सचिव संतोष कुरमेलवार, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर मद्देलवार यांनी केले. वीज वितरण कार्यालयावर डफडे वाजवत हा मोर्चा नेण्यात आला. गावातील एकही पुढारी विजेच्या संदर्भात पुढे न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वन कार्यालयावर झालेल्या दगडफेकीमुळे काही ग्रामस्थांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचीच धास्ती घेऊन काही नागरिकांनी मोर्चात न जाणे पसंत केले. यावेळी पोलिसांनी वीज वितरण कार्यालयाला गराडा घातला होता. मात्र मोर्चेकऱ्यांनी शांतपणे कटारे यांना निवेदन दिले. यावेळी सहाय्यक अभियंता बी.एस.चव्हाण उपस्थित होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायब तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पडघन, पीएसआय अनिल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मारेगाव, वणी, पाटण, शिरपूर येथील पोलिसांचा अतिरिक्त ताफा बोलविण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)मोर्चाने पुनरावृत्ती टाळलीतीन महिनयांपूर्वी वाघाला मारल्याच्या आरोपावरून बाप-लेकाला वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येथील वन कार्यालयावर दगडफेक केली होती. यात वाहनाच्या काचा फुटल्या होत्या. पोलिसांवरही दगडफेक झाली होती. नंतर याप्रकरणी कही ग्रामस्थांविरूद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्या घटनेची दखल घऊन यावेळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पूर्वीच्या मोर्चांची पुनरावृत्ती टळली. पोलिसांनी मात्र मागील घटनेचा धसका घेऊन चांगलाच बंदोबस्त ठेवला होता.