शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस वीज वितरणचा कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:12 IST

येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.

ठळक मुद्देरोहित्र उघडे : कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियेतचा ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.शहरातील गवळीपुरा येथील विद्युत रोहित्रामध्ये सोमवारी रात्री अचानक स्पार्किंग झाली. यात रोहीत्र जळून खाक झाले. उन्हाळ्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे लक्ष देत नाही. कोणतीही दक्षता घेतली जात नाही. अपघात घडण्यापूर्वीच दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार सुरूच आहे.यानंतर गुरुवारी मध्यरात्री २ वाजतानंतर दिनबाई शाळेसमोरील मेन सर्व्हिस लाईनची तार अचानक तुटली. यामुळे शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला. ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास येतात, त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला माहिती दिली. मात्र त्या अभियंत्याचे मोबाईल उचलण्यास कर्मचाऱ्यांना सवड नव्हती. अखेर अभियंता पटेल व त्या नागरिकाने स्वत: इतर नागरिकांच्या सहकार्याने तुटलेल्या तारा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत पोलिसांनीही घटनास्थळ गाठले होते.वीज वितरणचे बहुतांश अधिकारी बाहेर गावी राहातात. त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि कंत्राटदार स्थानिकचे रहिवासी आहे. हे कर्मचारी व कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नाही. उलट अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव निर्माण केला जातो, अशी चर्चा आहे. वीज केंद्रातील रात्रपाळीचे कर्मचारी जाणीवपूर्वक वीज पुरवठा बंद करून जनतेला त्रास व्हावा व जनतेत अधिकाऱ्यांविरूद्ध रोष निर्माण व्हावा म्हणून अशी कृत्ये करीत असल्याचा आरोपही आता होत आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले जातात. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन अधिकाऱ्यांना परिस्थितीला सामोरे जावे लागते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आता ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा नागकि व्यक्त करीत आहे.कर्मचारी, कंत्राटदारांची टगेगिरी वाढलीवीज वितरणचे कर्मचारी, कंत्राटदार अधिकाऱ्यांना जुमानत नाही. स्थानिक कर्मचारी, कंत्राटदार, कामगार यांच्या टगेगिरीमुळे अधिकारी हतबल झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांविरूद्ध जाणीवपूर्वक रोष वाढवून कंत्राटदार आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. अधिकारी व कर्मचारी आणि कंत्राटदारांमधील या शीतयुद्धाचा परिणाम मात्र जनतेला सोसावा लागतो. त्यांना नाहक दिवसा उकाड्यात, तर रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.