शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण अंगणवाड्या पडताहेत ओस

By admin | Updated: June 11, 2014 23:40 IST

१० ते १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना चांगले दिवस होते. गावातील चिमुकले सकाळी १० वाजता नटून-थटून जेवणाचा डब्बा घेऊन अंगणवाडीत जात असत. परंतु काळ बदलला.

पुसद : १० ते १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना चांगले दिवस होते. गावातील चिमुकले सकाळी १० वाजता नटून-थटून जेवणाचा डब्बा घेऊन अंगणवाडीत जात असत. परंतु काळ बदलला. त्याची जागा कॉन्व्हेंटने घेतल्याने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांनाही उतरती कळा लागली आहे. इंग्रज या देशातून हद्दपार झाले असले तरी त्यांच्या इंग्रजी भाषेने भारतीय मनावर परिणाम केला आहे. त्यांची परिणती आज इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृतीत झाली आहे. इंग्रजी दुधावर पोसली जाणारी कोवळी मुले मातृभाषेपासून दुरावत आहे. शहरी संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर असणारे कॉन्व्हेंटचे वारे आता ग्रामीण भागात पोहचले आहे. आज पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात १० ते १२ कॉन्व्हेंट सुरू आहेत. तालुक्यात २४४ अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारा सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दिशेने नसणारे वातावरण हेही महत्त्वाचे कारण विद्यार्थी गळतीचे असल्याचे बोलल्या जाते. शहरी विभागाप्रमाणे ग्रामीण भागातही कॉन्व्हेंटचे भरपूर पीक आले आहे. इंग्रजी शिक्षणाची क्रेझ असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाडीत टाकण्याऐवजी कॉन्व्हेंटमध्ये टाकत असल्याने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना उतरती कळा लागली आहे. आधी ग्रामीण भागातील चिमुरडे ‘नाच रे मोरा’ हे गीत तोतड्या आवाजात हमखास घरी म्हणायचे, पण आता कॉन्व्हेंटच्या जमान्यात या गीतांची जागा जॉनी जॉनी एस पप्पा, टिष्ट्वंकल टिष्ट्वंकल या इंग्रजी गीतांनी घेतली आहे. प्राथमिक पूर्व शिक्षणाचा पाया म्हणून आधी बालवाडींकडे पाहिले जायचे. लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी बालवाड्यांवर असायची. मात्र आता हे चित्र पूूर्णत: बदलून गेले आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्यिकांची मुलेसुद्धा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसत आहे. परिणामी मराठी शाळासुुद्धा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शिक्षणाचे दिवसेंदिवस वाढणारे फॅड यामुळे अंगणवाड्यासह मराठी माध्यमांच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहे. (तालुका प्रतिनिधी)