शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या विकासावरून नगरपरिषदेत सुंदोपसुंदी

By admin | Updated: February 5, 2016 01:56 IST

येथील नगरपरिषदेत भाजपा नगरसेवक कोट्यवधींच्या विकास निधीचा दावा करीत आहेत.

सत्ताधारीच आंदोलक : भाजपा नगरसेवकाचा कोट्यवधींचा दावा यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपा नगरसेवक कोट्यवधींच्या विकास निधीचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे सत्तेतीलच बसपाच्या सभापतींनी मुलभूत सुविधेसाठी आंदोलन करतात. या सर्वांवर कहर म्हणजे कायम दोलायमान भूमिकेत असलेल्या माजी नगराध्यक्षाने पत्रपरिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या घोषणाबाजीतून काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न जनतेला पडला असून निवडणुका जवळ आल्याची ती नांदी ठरत आहे.यवतमाळ शहरात सुरू असलेली विकास कामे कोणाच्या पाठपुराव्याने आलीत हे सर्वश्रृत आहे. यातील बहुतांश कामांमध्ये वाद उपस्थित होत आहे. आता विकास आराखड्याचे गाजर दाखवित अमृत शहर योजनेच्या नावाखाली घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. या योजनेतून शहरासाठी ५०० कोटी मिळतील, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ५०० कोटींच्या २५ टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून भरावी लागणार आहे. इतकी आर्थिक सुबत्ता नगरपरिषदेजवळ नाही. एक मात्र गृह करातून मिळणारे उत्पन्न वगळता इतर सर्वस्रोत बंद पाडण्यात आले आहे. अशा स्थितीत लोकवर्गणीसाठीची रक्कम जुळविणे शक्यच नाही. तेव्हा निधी मिळणार कसा असा प्रश्न आहे.विकास निधीची घोषणा करताना भाजपाचे स्थानिक आमदार, नगर परिषदेतील मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यापैकी एकही जबाबदार व्यक्ती पुढे आले नाही. भाजपाच्या तिसऱ्या फळीतील एका नगरसेवकाने याची घोषणा करावी, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या नगर परिषद उपाध्यक्षांनी ब्रसुद्धा काढला नाही. भाजपासोबत सत्तेतील बसपानेसुद्धा मुलभूत सुविधांसाठी आंदोलन केले. महिला बालकल्याण सभापती ज्योती खोब्रागडे यांनी धरणे दिले. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच असा संदेश त्यांनी दिला आहे. बसपाच्या चार सदस्यांच्या भरोश्यावरच येथील सत्तेचा डोल्हारा टिकून आहे. आठवड्याभरातच नगरपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी पत्रपरिषद घेऊन पालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. मात्र त्यांच्या पत्रपरिषदतेपूर्वी एक दिवस अगोदर झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी साधा जाबही विचारला नाही. सभागृहात एक अन् सभागृहाबाहेर दुसरी अशी दुटप्पी भूमिका दिसून आली. एकंदरीत नगर परिषदेतील विकास आणि त्यावरच्या वल्गना यातील दांभिकता सर्वांसाठीच क्लेषदायक ठरत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)